क्रिकेट जगतात मोठी खळबळ, सेक्सटॉर्शनमध्ये महिला क्रिकेटपटू पकडली, आधी चॅट नंतर…

क्रिकेट विश्वाला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील एका महिला क्रिकेटपटूसह तिच्या दोन (shocking incident) साथीदारांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणामुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फरखांदा अझीझ खान (वय 30) आणि तिचा भाऊ बाझिल अझीझ खान (वय 27) यांचा समावेश असून, त्यांना नवी दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या साथीदार उद्दीन इम्तियाज वानी (वय 22) याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली. फरखांदा खान ही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून ती महिला टी-20 लीगमध्येही सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 28 वर्षीय युवक असून तो कुलाबा परिसरात राहतो. 2024 साली त्याची फरखांदा खानशी ओळख झाली होती. सुरुवातीला मोबाईल चॅटद्वारे वाढलेली ओळख नंतर कथित अश्लील संभाषणापर्यंत पोहोचली. त्यानंतर फरखांदाने आपल्या भावाची आणि वानीची ओळख करून दिली.

यानंतर आर्थिक अडचणींचा हवाला देत फरखांदाने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने खाजगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या तक्रारदाराने एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत 32 व्यवहारांद्वारे सुमारे 23.61 लाख रुपये तिच्या खात्यात जमा केले.

तपासात असेही उघड झाले की, या पैशांपैकी मोठा हिस्सा उद्दीन वानीच्या खात्यात वळवण्यात आला होता, तर काही रक्कम फरखांदाच्या वडिलांच्या खात्यातही जमा करण्यात आली होती. आरोपींनी तक्रारदाराला त्याच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट असल्याचे सांगत गंभीर परिणामांची धमकी दिली. या दबावामुळे जानेवारी 2026 मध्ये तक्रारदाराने आणखी 40 लाख रुपये आरोपींना दिले.

मात्र सातत्याने सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेने तपास करत या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आणि तिन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान