घरातील बर्फ पांढरा आणि बाजारातील बर्फ पारदर्शक का असतो? कारण जाणून घ्या

कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. घर ते रेटॉरन्ट्स सगळीकडेच आजकाल बर्फ वापरला जातो. गरम वातावरणात काही तरी थंड खाल्लं जातं. थंड म्हंटल की बर्फ आलाच. उन्हाळा सुरू झाला की घराघरात बर्फेचा वापर वाढतो. थंड पाणी, ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीमसाठी. काहीजण घरच्या फ्रिजमध्येच बर्फ तयार करतात, तर काहीजण बाहेरून रेडी तयार आइस क्यूब्स आणतात. पण या दोन्ही बर्फांमध्ये एक स्पष्ट फरक दिसतो तो म्हणजे घरची बर्फ पांढरा आणि धूसर असा असतो तर, बाजारातील बर्फ अगदी काचेसारखी स्वच्छ आणि पारदर्शक दिसते. हा फरक नेमका कशामुळे आहे हे फारच इंटरेस्टिंग आहे. चला जाणून घेऊयात की, घरातील बर्फ पांढरा आणि बाजारातील बर्फ पारदर्शक का असतो.

घरच्या फ्रिजमध्ये जेव्हा आपण पाणी आइस ट्रेमध्ये भरतो, तेव्हा ते चारही बाजूंनी एकाच वेळी गोठायला सुरुवात करते. ही प्रक्रिया वेगाने आणि अनियंत्रितपणे होते. पाण्यात आधीपासून असलेली हवा, सूक्ष्म कण, तसेच खनिजे (जसे कॅल्शियम, मॅग्नेशियम) यांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी, हे सर्व घटक बर्फाच्या मध्यभागी अडकून राहतात. त्यामुळे आत लहान-लहान बुडबुडे, फटी आणि अशुद्धता तयार होते. (weather) यामुळे प्रकाश व्यवस्थित आरपार जाऊ शकत नाही आणि बर्फ पांढरी किंवा धूसर दिसते.

बाजारात मिळणारा बर्फ स्पेशल कमर्शियल मशीनमध्ये तयार केला जातो. या मशीनमध्ये ‘डायरेक्शनल फ्रीजिंग’ हे तंत्र वापरले जाते. म्हणजे पाणी एकाच दिशेने वरून खाली किंवा एका बाजूने हळूहळू गोठवले जाते. या प्रक्रियेत गोठताना हवा आणि अशुद्धता खाली ढकलल्या जातात. शेवटी त्या वेगळ्या भागात जमा होतात किंवा पूर्णपणे काढून टाकल्या जातात. परिणामी, उरलेला बर्फ पूर्णपणे स्वच्छ आणि पारदर्शक बनते.

घरच्या वापरासाठी आपण साधे नळाचे पाणी वापरतो, ज्यामध्ये खनिजे आणि विरघळलेली वायूअसतात. हे घटक बर्फेला धूसर बनवतात. दुसरीकडे, कमर्शियल आइस बनवताना फिल्टर केलेले किंवा शुद्ध पाणी वापरले जाते.(weather) त्यामुळे अशुद्धता आधीच कमी केलेली असते आणि तयार होणारी बर्फ अधिक स्वच्छ दिसते. बाजारातील बर्फ तयार करताना तापमान आणि वेळ यांचे अचूक नियंत्रण ठेवले जाते. काही मशीनमध्ये पाण्याचे थर-थर तयार केले जातात किंवा स्प्रे तंत्र वापरले जाते. ही संथ आणि नियंत्रित प्रक्रिया बर्फेत हवा अडकू देत नाही. त्यामुळे बर्फ पारदर्शक आणि मजबूत तयार होतो.

पारदर्शक बर्फ केवळ दिसायला सुंदर नसतो, तर ती अधिक हळू वितळते. (weather) त्यामुळे ड्रिंक्समध्ये बर्फ जास्त वेळ थंडावा टिकवून ठेवतो आणि चवही लवकर मेल्ट होत नाही. घरचे बर्फ तुलनेने लवकर वितळतात कारण त्यात अडकलेली हवा आणि अशुद्धता असते.घरातील आणि बाजारातील बर्फ यातील फरक हा कोणत्याही जादूमुळे नाही, तर पूर्णपणे वैज्ञानिक प्रक्रियेवर आधारित आहे. गोठवण्याची पद्धत, पाण्याची गुणवत्ता आणि प्रक्रिया नियंत्रण यामुळेच बर्फेचा रंग आणि पारदर्शकता ठरते.

हेही वाचा

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला

अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान