कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
इंडिया आघाडीने नारीशक्ती (Women’s)वंदन विधेयक ना मंजूरकेल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुंबईत भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा, या मोर्चामुळे दक्षिण मुंबईमध्ये वाहतुकीची झालेली कोंडी, आणि त्यामुळे आपल्या मुलाला त्याच्या शाळेतून आणण्यासाठी फारच उशीर होतो आहे म्हणून एका तरुणीने या मोर्चा विरुद्ध उठवलेल्या आवाजाची या मोर्चापेक्षा जास्त राज्यभर चर्चा सुरू आहे.

द वेन्सडे या हिंदी चित्रपटात (Women’s)कॉमन मॅन च्या भूमिकेत अनुपम खेर यांनी मुंबईतील सर्वसामान्य जनतेच्या “जगण्यावर”सुंदर भाष्य केले आहे. हा चित्रपट खूपच गाजला होता. आजही तो अधून मधून केव्हातरी छोट्या पडद्यावर पाहायला मिळतो. त्याच्याहीपूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांनी”प्रहार”नामक चित्रपट निर्माण केला होता. हा चित्रपट सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या अडचणीत वाढ करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध प्रश्न निर्माण करणारा होता. मुंबईत देशाच्या पंतप्रधानांचा दौरा आहे.
त्यांचा ताफा रस्त्यावरून (Women’s)निघाला आहे. आणि ताफा येण्याच्या आधी कितीतरी तास, एक महत्त्वाचा रस्ता पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणावरून बंद केलेला आहे. आणि त्याचवेळी पोटात प्रस्तुतीच्या जोरदार कळा येणारी एक महिला रस्त्यावरच थांबली आहे. तिला रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या रुग्णालयात जायचे आहे. तिची दयनीय अवस्था पाहूनही बंदोबस्तावरील पोलीस केला थांबवून ठेवतात. अशावेळी प्रहार चानायक असलेला नाना पाटेकर त्या पोलीस अधिकाऱ्याला उद्देशून”जाऊ द्या ना त्या महिलेला! ती अवघडलेली आहे”असे सांगतो.
पण पोलीस अधिकारी ऐकत (Women’s)नाही. असा एक व्यवस्थेवरचा प्रसंग या चित्रपटात आहे. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचा मोर्चा होता. वरळी डोम येथे नारी शक्ती वंदन विधेयकाला लोकसभेत इंडिया आघाडीने विशेषता काँग्रेसने विरोध केला म्हणून निदर्शने केली जाणार होती. हा मोर्चा वरळी डोम कडे निघाला होता आणि अर्थातच पोलिसांनी वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे दक्षिण मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एका तरुणीला तिच्या मुलाला त्याच्या शाळेतून आणण्यासाठी जायचे होते. पण पोलिसांनी वाहतूक रोखून धरली होती.
किमान तास ते दीड तास (Women’s)त्यात तरुणीला पुढे जाता येत नव्हते. शाळा सुटल्यामुळे आपला मुलगा तेथे आपली वाट पाहत असेल, आणि लगेच तेथे आपल्याला पोहोचता येत नाही असे लक्षात आल्यावर त्या तरुणीने बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्याशीचांगलीच हुज्जत घातली. ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्यांशी ती तरुणी तावातवाने आणि रागाने बोलत आहे आणि तो पोलिस अधिकारी शांतपणे उभा आहे हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली.
वास्तविक मुंबई शहरात(Women’s) मोर्चा काढण्यासाठी उच्च न्यायालयाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. ज्या कुठल्या राजकीय पक्षाला किंवा संघटनेला सरकारी विरुद्ध निदर्शने करावयाची आहेत त्यांनी ती आझाद मैदानात करावीत असा पर्याय उच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेला आहे. असे असतानाही हा मोर्चा निघालास कसा असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तेव्हा भाजपाचे अवधूत वाघ नावाचे जेष्ठ कार्यकर्ते यांनी सांगितले की आमचा मोर्चा नव्हता.
भाजपच्या महिला वरळी(Women’s) डोम येथे निदर्शने करण्यासाठी पायी निघाल्या होत्या. असा खुलासा केला आहे. पण याबद्दलची दृश्य पाहिल्यानंतर भाजपचा तो मोर्चा नव्हता असे सामान्य माणूस म्हणणार नाही. महाराष्ट्रात अनेक संघटनांच्या वतीने अधून मधून आंदोलन केले जाते. चक्काजाम हे आंदोलन नाही अनेकदा केले जाते. त्यामुळे राज्यातील महत्त्वाचे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प होतात. महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल होते. इतर महानगरातही काही मागण्यांसाठी राजकीय पक्ष तसेच संघटना मोर्चे काढतात.
त्यामुळे मोर्चाच्या मार्गावर(Women’s) अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. मंगळवारी मुंबईत असेच झाले आणि त्याचा त्रास झालेल्या तरुणीचा संयम सुटला आणि तिने वाहतूक रोखून धरल्याबद्दल पोलीस प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला किंवा आवाज वाढवला आणि जाब विचारला. तिचा तो व्हिडिओ कॉमन मॅन चा प्रातिनिधीक आवाज म्हणून व्हायरल केला जातो आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार