जगभरातील कामकाजाच्या बदलत्या पद्धतीमुळे कार्यालयीन वातावरणाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे एका नव्या अहवालातून समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) ने जाहीर केलेल्या या अहवालानुसार, टॉक्सिक वर्क कल्चर, कामाचा वाढता ताण आणि नोकरी गमावण्याची भीती यांसारख्या कारणांमुळे दरवर्षी 8 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत आहे. ही आकडेवारी केवळ धक्कादायकच नाही, तर आधुनिक कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, कार्यालयातील नकारात्मक वातावरणामुळे निर्माण होणारे सायकोसोशल रिस्क हे आजारांचे मुख्य कारण बनत आहेत. सततची चिंता, जास्त वेळ काम करण्याची सवय आणि असुरक्षिततेची भावना (health) यामुळे शरीरावर आणि मनावर मोठा ताण पडतो. या परिस्थितीतून हृदयविकार आणि मेंदूशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. विशेषतः यांसारख्या गंभीर आजारांमुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार्यालयातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्याशी असलेले संबंधही या समस्येला कारणीभूत ठरत आहेत. संवादाचा अभाव, सततचा तणाव आणि कामाचे असमतोल वाटप (health) यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण होते. याशिवाय वर्क फ्रॉम होमच्या वाढत्या पद्धतीमुळे काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडत असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
या अहवालासाठी आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासातील आरोग्यविषयक डेटाचा आधार घेण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, जर कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले नाही, तर येत्या काळात (health) अशा प्रकारच्या मृत्यूंचे प्रमाण आणखी वाढू शकते.तणावमुक्त, सहकार्यपूर्ण आणि संतुलित कार्यसंस्कृती विकसित करणे ही काळाची गरज बनली असून, यासाठी कंपन्या आणि सरकारांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता अधोरेखित केली जात आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार