उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मराठवाडा दरम्यान प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असतानाच मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या कामांमुळे रेल्वे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. कडून २५ आणि २६ एप्रिल रोजी खर्डी यार्ड रिमॉडेलिंगचे काम करण्यात येत असून,(Railway) या कामासाठी कल्याण ते कसारा दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून काही गाड्या अंशतः रद्दही करण्यात आल्या आहेत.

या बदलांनुसार राज्यराणी एक्सप्रेस ही गाडी मनमाडपर्यंतच धावणार असून, पुढील प्रवास रद्द करण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी हीच गाडी मनमाडपासूनच सुरू होणार आहे. (Railway) यामुळे मुंबई ते मनमाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.दरम्यान नंदिग्राम एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून त्या कल्याण, कर्जत, पुणे आणि मनमाड मार्गे धावतील. या बदलांमुळे प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता असून, प्रवाशांना वेळेचे नियोजन करूनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान मुंबईतील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे.ने मेट्रो प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल तिकीट खरेदीचा पर्याय विस्तारला आहे. (Railway)आता अॅपच्या माध्यमातूनही मेट्रो तिकीट सहज खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तिकीट खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या अॅप्सची संख्या १६ वर पोहोचली असून, स्थानकांवरील रांगांमध्ये उभे राहण्याची गरज कमी होणार आहे.रेल्वे वाहतुकीतील या बदलांमुळे काहीसा गैरसोय होणार असला तरी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ही कामे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार