20 वर्षांत 40 बदल्या लेडी सिंघमने थेट मुख्यमंत्र्यांना ठोकल्या बेड्या?

तुकाराम मुंढे यांनी FDA अर्थात अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात धडक कारवाई सुरू केल्याने त्यांची चर्चा होत आहे. मात्र, सध्या त्यांच्यापेक्षाही एका महिला IPS अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आले आहे. रूपा मौदगिल यांनी वीस वर्षांमध्ये तब्बल 40 बदल्या अनुभवल्या असून, कडक कार्यपद्धतीमुळे त्या सातत्याने प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत.

FDAच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यांच्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात असून, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासकीय सेवेत जवळपास 21 वर्षांच्या काळात मुंढे यांची 25 वेळा बदली झाली आहे. त्यांनी ज्या-ज्या विभागाची जबाबदारी स्वीकारली, (Food and Drug) त्या ठिकाणी आपल्या कामाच्या पद्धतीचा ठसा उमटवला. त्यामुळे त्यांची बदली आणि त्यानंतरची कामगिरी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

मात्र बदल्यांच्या संख्येच्या बाबतीत रूपा मौदगिल यांचा प्रवास आणखी वेगळा ठरतो. कर्नाटक कॅडरच्या 2000 बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या रूपा मौदगिल यांची मागील 20 वर्षांत तब्बल 40 वेळा बदली झाल्याचे सांगितले जाते. एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्यामुळे त्या एकाच ठिकाणी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. मात्र पद किंवा ठिकाण बदलले तरी त्यांच्या कामाच्या शैलीत फरक पडला नाही. ज्या विभागात नियुक्ती झाली, तेथे त्यांनी कठोर भूमिका कायम ठेवली आणि आपल्या कार्यपद्धतीने वेगळी ओळख निर्माण केली.

रूपा मौदगिल यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेकदा वाद निर्माण झाले, परंतु त्याचबरोबर त्यांच्या धाडसी कारवाईची देशभरात चर्चा झाली. गुन्हेगारांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाल्याचेही या संदर्भात नमूद केले जाते. (Food and Drug) त्यामुळे वारंवार बदली होऊनही त्यांनी ज्या ठिकाणी काम केले, तेथे कायदा आणि शिस्तीच्या मुद्द्यांवर कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या घटनांपैकी एक म्हणजे मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांविरोधात केलेली कारवाई. त्यांनी थेट मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अटक केली होती. (Food and Drug) त्यामुळे त्यांच्या धाडसी आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवणाऱ्या कार्यशैलीची चर्चा अधिक झाली. गेल्या दोन दशकांत 40 बदल्या होऊनही कामाचा वेग आणि पद्धत कायम ठेवल्यामुळे रूपा मौदगिल यांचे नाव देशभरात चर्चेत राहिले आहे. सध्या तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईसोबतच या महिला IPS अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचीही तुलना केली जात आहे.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?