ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर काल मोठा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. (leader Laxman) यादरम्यान नक्की काय घडले हे सांगताना लक्ष्मण हाके दिसले. लक्ष्मण हाके यांनी थेट जरांगेंना अटक करा, अशी मागणी केली.

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीन ते चार तरूणांनी हॉटेलमध्ये हाकेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या न्यायासाठी हाके यांनीही आंदोलन केले. (leader Laxman) हल्ल्यानंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा हल्ल्याच्या माध्यमातून प्रयत्न होता. हा माझ्यावर झालेला अकरावा हल्ला होता आणि तो भ्याड हल्ला होता हे सगळे कार्यकर्ते जरांगेचे होते. लक्ष्मण हाकेचा जीव गेला तरी आम्ही ओबीसीचा आवाज थांबवणार नाही. ओबीसीच्या नेत्यांवर हल्ले करून शिवीगाळ करून तू आरक्षण घेऊ शकत नाहीत. पोलीस बंदोबस्त असताना देखील हे आमच्यावर हल्ले करतायेत म्हणजे हे कायद्याला मानत नाहीत.
कालचा हल्ला म्हणजे माझं जीव घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे फडणवीस यांनी भुताला आवरा… तुमच्या मानगुटीवर बसलेले भूत आहे या तीनपाटाला उचला आणि आत टाका तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा असे म्हणत जरांगे वर टीका केली. यासोबतच त्यांनी जरांगे यांना अटक करण्याची मागणी देखील केली आहेत. पुढे लक्ष्मण हाके यांनी म्हटले, जेवालय थांबलो होतो, (leader Laxman) आमच्यासोबत 10-12 पोलिस कर्माचारी होती. पहिल्या येऊन एकजण व्हिडीओ शूट करत होता आणि दुसरे काही लोक हुज्जत घालत होते. हॉटेलमध्ये दार लावून आम्ही जेवलो, तो भ्याड हल्ला होता. दारू पिऊन ते आले होते. मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते होते. भुजबळांवर तर एक जन दगड घेऊन गेला होता. पोलिस असूनही हे ऐकत नाहीत. जरांगे यांना माझा सल्ला आहे की, तू मुंबईत नको तर दिल्लीत जा… तू निझामच्या देशात नाही, इथे संविधानाचे पालक करावे लागते. ह्याला अटक करा फडणवीस याला अटक करा. हाके यांनी नक्की काय घडले होते, हे सांगितले आहे. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाल्याने पोलिस अधिक सर्तक झाले आहेत.
हेही वाचा :
माधुरी वनतारामधून निघाली शुक्रवारी पहाटेपर्यंत नांदणीत पोहचणार?
LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?
एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?