एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, एनसीएमसी कार्ड सक्तीला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ?

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले होते. परंतु, अनेक तांत्रिक अडचणी, (citizens) अनेकांची रखडलेली नोंदणी यामुळे एनसीएमसी अनिवार्य करण्याच्या निर्णयास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले असून, ३० सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीनेच सवलतीचे तिकीट देण्यात येणार आहे. मात्र, ज्यांचे एनसीएमसी कार्ड आधीच सक्रिय झाले आहे, त्यांनी कार्डद्वारेच सवलतीचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या बसमधून शासनाच्या सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट आता एनसीएमसी कार्डद्वारे दिले जात आहे. परंतु, एनसीएमसी कार्ड असूनही प्रवाशांना कार्ड रिचार्ज करणे, कार्ड ॲक्टिव्हेशन, कार्डमध्ये रक्कम टॉपअप करणे, कार्डमधील उपलब्ध बॅलन्स तपासणे, (citizens) तसेच कार्डच्या वापराबाबत इतर तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि आगार व्यवस्थापकांना चालक – वाहकांना तातडीने सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही पात्र प्रवाशाला सवलतीच्या तिकिटापासून वंचित ठेवू नये, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सर्व्हरवरील ताण – एनसीएमसी कार्ड १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य केल्यानंतर एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रणालीचा वापर सुरू केला. त्यामुळे सर्व्हरवर ताण वाढून सेवा संथ झाल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले.

प्रवाशांची गैरसोय – सर्व्हर धीमा झाल्यामुळे प्रवासादरम्यान सवलतीचे तिकीट मिळण्यास ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना अडचणी येत होत्या.

प्रशासकीय निर्णय – तांत्रिक अडथळे लक्षात घेता सक्षम प्राधिकरणाने सक्तीच्या निर्णयाला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत स्थगिती देऊन मुदतवाढ दिली.

प्रचलित पद्धतीने सवलत सुरू राहणार – ज्या प्रवाशांकडे अद्याप एनसीएमसी कार्ड नाही, त्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत जुन्या/प्रचलित पद्धतीनुसारच प्रवासातील सवलतीचे तिकीट दिले जाईल.

सक्रीय एनसीएमसी कार्डधारकांसाठी नियम – ज्या प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड सक्रिय झाले आहे, (citizens) त्यांनी मात्र कार्डद्वारेच प्रवासाची सवलत घ्यावी.

आगार व्यवस्थापक व वाहकांना सूचना – सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि आगार व्यवस्थापकांनी आगार पातळीवर वाहक व चालकांना या निर्णयाची माहिती देऊन प्रवाशांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?

हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?

शहरातील डीपी रोड, रिंग रोड खुले करा?