पुण्यातल्या पिंपरी चिंचवड येथील निगडीच्या यमुना नगर भागातली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपात मेट्रोच्या एका कंत्राटी कामगाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा थरार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी मेट्रोच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.निगडी पोलिसांनी या आरोपी कर्मचाऱ्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेली असताना ती शंकराच्या पिंडीपुढे वाकून नमस्कार करत होती. ती शांतपणे डोळे मिटून बसली होती. तेव्हा मेट्रोचा कर्मचारी मंदिराच्या गाभाऱ्यात आला.(Minor girl) मंदिराच्या गाभाऱ्यातच त्याने या मुलीचा विनयभंग केला आणि तिच्याशी गैरवर्तन केलं. या घटनेनंतर निगडी परिसरातील महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच, बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या कंत्राटदारांची आणि मजुरांची कसून चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला असल्याने आरोपीचं गैरकृत्य कॅमेरात कैद झालं. या फुटेजमुळे पोलीस तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. निगडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी मंदिरात एकटी होती आणि शंकराची प्रार्थना करत होती. (Minor girl) त्यावेळी तिथे तो मेट्रोसाठी काम करणारा कंत्राटी कर्मचारी आला. त्याला मंदिराच्या बाहेर असलेल्या टाकीतून पाणी भरायचं होतं. त्यावेळी तो मंदिरात डोकावला. मंदिरात ही मुलगी एकटीच बसलेली होती. त्यामुळे त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी जेव्हा ओरडू लागली तेव्हा आरोपी तिथून पळून गेला. पण सीसीटीव्ही फुटेज असल्याने त्या मदतीनेच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं आहे पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामगाराकडून मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न होणे, ही महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना आहे! मंदिरातही लेकी-बाळी सुरक्षित नाहीत, तर महिला सुरक्षेच्या वल्गना करणाऱ्या सरकारने खुर्च्या उबवण्यापलीकडे नेमकं केलंय तरी काय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? महिलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवण्याची हिंमत सरकारने दाखवावी! (Minor girl) अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी
पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ