महामार्ग रोकोमुळे वाहतूक ठप्प कागल-हुबळी मार्ग बंद, पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-४८) सीमाभागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी प्रवाशांना (farmers) अत्यंत तातडीचे काम असल्याशिवाय पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, (farmers) यासाठी बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी मिरज-गोकाक या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असा सल्ला पोलीस प्रशासनाने दिला आहे. कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सीमाभागातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना याचा फटका बसत आहे.

दरम्यान, वाहतुकीचा हा अडथळा कर्नाटकच्या हद्दीत असून महाराष्ट्रातील महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. मात्र, सीमाभागातील परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांनी खबरदारी घ्यावी. (farmers) विनाकारण वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी

पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ

पावसाळा संपला, तरी माणगंगेची तहान भागेना नदीपात्र कोरडे ठाक