उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेंदूच्या नसांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

तरुण वयातील मुलामुलींपासून ते अगदी वयस्कर लोकांमध्ये उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे अतिशय तीव्र होतात आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात. रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मेंदूच्या नसांवर जास्तीचा तणाव येतो आणि मेंदूच्या नसा फाटण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे.लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचेजीवनशैलीतील कोणत्या चुकांमुळे उच्च रक्तदाब वाढतो
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जास्त मीठ, तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते. फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात सोडियमची पातळी झपाट्याने वाढू लागते. वाढत्या सोडियमचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. (blood pressure)त्यामुळे आहारात कायमच सात्विक आणि पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य कायमच निरोगी राहण्यास मदत होते.
हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे मानसिक तणावात झपाट्याने वाढ होत आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे हृदयावर ताण येतो आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. (blood pressure)त्यामुळे कमीत कमी मानसिक तणाव घेऊन आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्त तणाव घेतल्यास मेंदूच्या नसांना हानी पोहचण्याची शक्यता असते.
सततच्या कामाच्या धावपळीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. शारीरिक हालचालींचा अभाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, व्यायाम न करणे किंवा चालण्याची सवय नसणे इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे रक्तभिसरण व्यवस्थित होत नाही. यामुळे शरीरात उच्च रक्तदाब वाढतो.(blood pressure) तसेच शारीरिक हालचालींचा शरीरात अभाव निर्माण झाल्यामुळे झपाट्याने वजन वाढणे किंवा लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.झोपेची कमतरता, अपुरी झोप, चुकीच्या वेळी जेवण, अनियमित झोपेची सवय इत्यादी गोष्टींमुळे शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळत नाही. विश्रांतीच्या अभावामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होते. धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयी, अनुवंशिकता, मधुमेह इत्यादी आजारांमुळे सुद्धा शरीरात उच्च रक्तदाब वाढतो.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार