केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक आजारी कोल्हापूर दौरा एनवेळी रद्द हुबळीतूनच दिल्लीला रवाना?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा नियोजित कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. (Kolhapur) त्यामुळे अमित शहा हे कर्नाटकच्या हुबळी येथून थेट दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांचा दोन दिवसाचा कोल्हापूर दौरा रद्द झालाय.

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर आणि हुपरी परिसरात स्थानिक नेत्यांकडून फ्लेक्स लावण्यात आले होते. त्याशिवाय प्रशासनाकडून कडक बंदोबस्त आणि भव्य तयारी करण्यात आली होती. (Kolhapur) संपूर्ण शहरभर अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर आणि फलक लावले होते. पण दौरा रद्द झाल्याची माहिती मिळताच हे सर्व फलक तातडीने हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.अमित शहा यांच्या हस्ते हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते.

‘वेस्ट टू बेस्ट’ आणि शून्य कचरा (Zero Waste) संकल्पनेवर आधारित असलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथेही त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार होते. स्थानिक आमदार राहुल आवाडे यांच्याकडून हुपरीतील या कार्यक्रमासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. आता अमित शहा यांच्या अनुपस्थितीत हा भव्य कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Kolhapur) याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : 

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?

‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?

भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?