महावितरण कंपनीकडून स्मार्ट मिटर लावणेसाठी यंत्रमागधारकांना नाहक त्रास देणेत येत आहे. याबाबत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने स्मार्ट मीटरला विरोध आहे. तसेच, स्मार्ट मीटर बळजबरीने बसवू नये, यंत्रमागधारकांना त्रास देऊ नये, असे निवेदन महावितरण कंपनी इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांना शुक्रवारी देण्यात आले. महावितरणचे अधिकारी व वायरमन कर्मचारी यंत्रमागधारकांना नाहक त्रास देत आहेत. ते तात्काळ थांबवले नाही तर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, (Mahavitaran) असा इशारा त्यांनी दिला आहे. या माध्यमातून यंत्रमाग धारकांनी पुन्हा एकदा स्मार्ट मीटर विरोधातील आपली तीव्र प्रतिक्रिया आज व्यक्त केली.

महावितरण द्वारे व्यावसायिक आणि औद्योगिक (औद्योगिक/व्यवसाय) ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. या मीटरमुळे दिवसा आणि रात्रीच्या वेगवेगळ्या वेळेनुसार विजेचे दर आकारले जातात. सूर्यप्रकाशाची उपलब्धता जास्त असताना (दिवसा) वीज वापरल्यास औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना सवलत किंवा कमी दर मिळू शकतात. (Mahavitaran) अचूक डेटा स्वयंचलितपणे ट्रान्सफर होत असल्याने मॅन्युअल रीडिंगमधील चुका टळतात आणि पारदर्शक बिल मिळते, असा महावितरणचा दावा आहे. तथापि तो उद्योजकांना मान्य नाही. याला इचलकरंजीसह राज्यातील यंत्रमाग केंद्रातून विरोध होत आहे.
याबाबत आज महावितरण ला दिलेल्या निवेदनात इचलकरंजी फॉर्म असोसिएशनने म्हटले आहे की, उद्योजकांची वीज काही कारणाने बंद झाल्यास स्मार्ट मीटर बसविल्याशिवाय तांत्रिक दोष दुरूस्त केला जाणार नाही अशी आडवणूक केली जाते. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबदस्ती करणे, दादागिरीची भाषा वापरणे, यंत्रमाग उदयोजकांना भिती घालणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएनने महावितरणचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व संबंधीत अधिकारी यांना सांगितलेली आहे. लेखी निवेदनही दिलेले आहे. असे असतानाही पुन्हा तांत्रीक मुद्दा उपस्थित करून स्मार्ट मिटर लावणेसाठी जबरदस्ती कले जात असल्याच्या तक्रारी असोसिएशनकडे आलेल्या आहेत. यापूर्वी अनेक वेळा सांगूनही महावितरणचे अधिकारी व वायरमन कर्मचारी यंत्रमागधारकांना नाहक त्रास देत आहेत. आपण ते तात्काळ थांबविला नाही तर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
इचलकरंजीमध्ये निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला इचलकरंजीची महावितरण कंपनी पूर्णपणे जबाबदार असेल. (Mahavitaran) यापुढे अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. येथून पुढे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यंत्रमागधारकांच्या रोषास सामोरे जावे लागल्यास, त्यास पूर्णतः महावितरण कंपनी व संबंधित अधिकारी जबाबदार असतील. त्याचबरोबर तांत्रिक बाबिंमुळे एखाद्या उद्योजकाचा किंवा भागाचा वीज पुरवठा बंद असल्यास त्वरित चालू करून न दिल्यास यंत्रमाग उद्योजकांचे होणारे नुकसान महावितरण कंपनी, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वसुल केला जाईल. या पुढे महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही, असे निवेदन देण्यात आले असल्याची माहिती दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात दिली आहे.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?
सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?