१ ऑक्टोबरपासून मोठा बदल ज्येष्ठ नागरिक, महिलांना सवलतीचे तिकीट आता फक्त NCMC कार्डवरच?

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना एनसीएमसी कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, (Citizens) त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. (Citizens) त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत एनसीएमसी कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची क्यूआर कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे. विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्यूआर कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड सक्रिय करून त्यामध्ये टॉप- अपकरणे आवश्यक आहे.

एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. एनसीएमसी कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी भीम ॲपद्वारे टॉप – अप करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला क्यूआर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करून टॉपअप करता येणार आहे. (Citizens) दरम्यान, आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने एनसीएमसी कार्ड प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

हेही वाचा : 

सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?

सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?