ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कोल्हापुरात काँग्रेसचे आंदोलन?

केंद्रीय निवडणूक आयोगातील ३ पैकी २ आयुक्तांनी एसआयआर आणि इतर निर्णयांवर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप घेतले. (Election) त्याला प्रतिसाद न दिल्याने आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची व अटकेची मागणी करत सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. निदर्शनांदरम्यान ‘केंद्र सरकार चले जाव’, ‘मत वाचवा, लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजू आवळे, शहराध्यक्ष प्रविण केसरकर, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, जि. प.चे गटनेते एकनाथ पाटील, राहुल माने, दुर्वास कदम, स्वाती यवलुजे, दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, तौफिक मुल्लाणी, बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, वैशाली महाडीक, विनायक घोरपडे, सागर कोंडेकर, सरला पाटील, जयश्री कांबळे, संपत चव्हाण – पाटील, उदय पवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपसाठी निवडणूक आयोगात मॅच फिक्सिंग सुरू असल्याचा संशय आता स्पष्ट होत असल्याचे नमूद करण्यात आले.

निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे मूलभूत कर्तव्य असताना मागील काही वर्षांत आयोग सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यामुळे (Election) त्यांचा कारभार अत्यंत अकार्यक्षम व अपारदर्शक असल्याचे उघड झाले आहे. एसआयआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असून ही अत्यंत घातक बाब असल्याचा गंभीर आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. निदर्शनांदरम्यान ‘केंद्र सरकार चले जाव’, ‘मत वाचवा, लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

हेही वाचा : 

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?

UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?

दुष्काळाच्या यादीत सांगली जिल्ह्यातील चारच तालुके?