गुढ रम्य सूक्ष्म लघु कथाकार आमदार रोहित पवार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, हे कादंबरीकार लोकप्रिय होते. त्यांच्या कादंबऱ्या गुढ रम्य आणि वाचकांच्या हृदयाच्या धडधड वाढवणाऱ्या होत्या. गेल्या दोन पिढ्यांना त्यांच्या कादंबऱ्यांनी अक्षरशः वेड लावले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या दोन कादंबरीकारांची आठवण करून दिली आहे. त्यांनी “तो मफलर वाला कोण?” या नावाची सूक्ष्म लघुकथा लिहून तिची पुण्याच्या शनिवार वाडा परिसरात जाहिरात करून गेल्या दोन दिवसांपासून गुढ रम्य वातावरण तयार केले होते.

पण सोमवारी खास पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कथा वाचन केले तेव्हा ही तर नेहमीचीच कथा मफलर च नवं लेबल लावून सांगितल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीच्या विमानतळावर व्ही एस आर कंपनीच आणि अजितदादा पवार हे प्रवास करीत असलेलं विमान कोसळले. या अपघातात विमानातील कोणीही बचावलं नाही. हा अपघात महाराष्ट्राला धक्कादायक होता. अजितदादा पवार यांच्यासारखा अभ्यासू नेता या विमान अपघातात महाराष्ट्राने गमावला होता. जवळपास दहा महिने या अपघाताला होऊन गेले पण हा अपघात कशामुळे झाला? त्याची नेमकी कारणे काय? तो घातपात आहे काय? असेल तर त्या मागचा हेतू काय? ते कोणाला नकोसे झाले होते? त्यांच्या जाण्याने कुणाचा फायदा होणार होता? या प्रश्नाची उत्तरे अजूनही महाराष्ट्राला मिळालेली नाहीत. सोमवारी अजितदादा यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. तेव्हा विमान अपघात चौकशीचा अहवाल लवकरात लवकर मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे केली.

विमान अपघात प्रकरणातील दोषींना फासावर लटकवणार असे देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण प्रसंगी बोलताना सांगितले आहे. (Rohit Pawar) याचा अर्थ या अपघाताला कुणीतरी जबाबदार आहे असा होतो. गृहमंत्रालयाची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री जेव्हा असे बोलतात तेव्हा या विमान अपघाता मागे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे कुणाला वाटले तर नवल नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार वाडा परिसरात एक फलक लावण्यात आला होता. एका हँगरला मफलर लावण्यात आला होता. आणि विमान अपघात प्रकरणातील संशयित आरोपींना वाचवणारा मफलर वाला कोण? असा प्रश्न उपस्थित केला होता.

या फलकाने खळबळ उडाली होती. हा मफलर वाला कोण याबद्दल उलट सुलट चर्चाही सुरू झाली होती.व्ही एस आर या विमान कंपनीच्या संचालकाच्या चिरंजीवाच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले होते आणि त्यांनी तेव्हा गळ्याभोवती मफलर
लावला होता. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत गळ्याभोवती मफलर लावलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर केला होता. या विमान अपघाताला फडणवीस हे जबाबदार नाहीत मात्र ते घातपात घडवून विमान अपघात भासवणाऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहेत असा आरोप केला होता. (Rohit Pawar) एखाद्या भयंकर गुन्ह्यातील संशयीतांना वाचवणारा हा सुद्धा सह आरोपी असतो. हे रोहित पवार यांना माहीत नाही असे कसे म्हणता येईल? याचा अर्थ ते अप्रत्यक्षपणे या विमान अपघात की घातपात याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा होऊ शकतो.

एखाद्या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त करणे, तो घातपातच आहे असे वारंवार सांगणे, याबद्दल कुणाची हरकत असण्याचे कारण नाही.सर्वसामान्य जनतेच्या मनातही या विमान अपघाताबद्दल संशय आहे आणि तो दूर झाला पाहिजे. (Rohit Pawar) त्याची जबाबदारी या घटनेची चौकशी करणाऱ्यांच्या वर आहे. आमदार रोहित पवार यांनी विमान अपघात घडल्याच्या पहिल्या दिवसापासून हा विषय लावून धरलेला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. यापूर्वीही त्यांनी काही पत्रकार परिषदांमध्ये विमान अपघाता मागे कुणीतरी शक्ती आहेत. त्यांनी हा विमान अपघात घडवून आणलेला आहे. दारू प्यायलेला पायलट मुद्दाम या विमानासाठी देण्यात आला होता. मुंबईहून शासकीय कार ने पुण्याला जाण्याचा अजितदादांचा निर्णय अचानक का बदलला? विमानाने जाण्याचा निर्णय त्यांनी कोणत्या स्थितीत घेतला?

पुण्याला जाण्यासाठी मुद्दाम विलंब व्हावा आणि परिणामी ते विमानाने जावेत असे कोणाला वाटत होते असे काही प्रश्न उपस्थित करून रोहित पवार यांनी हे विमान अपघात की घातपात प्रकरण गुढ रम्य बनवले आहे. पण त्यांना त्यासाठी हा मफलर वाला कोण? असा प्रश्न उपस्थित करून एका कपडे लावण्याच्या हँगरला मफलर लावण्याचे आणि एक प्रकारचे गुढ रम्य वातावरण तयार करण्याचे कारण नव्हते. त्यासाठी अति सूक्ष्म लघुकथा लिहिण्याचे कारण नव्हते. त्यातून त्यांनी काय साध्य केले?

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू