सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड आणि उपाध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली. (Congress) नूतन पदाधिकारी निवडीच्या बैठकीस भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर वगळता अन्य सर्व संचालक उपस्थित होते.

जिल्हा मध्यवतीर्र् बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १५ संचालकांची अविरोध निवड झाली होती. तर सहा जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे आ. पडळकर यांच्यासह माजी खासदार संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे, अण्णासाहेब कोरे, संभाजी कचरे आणि कृष्णा कांबळे हे मतदानाद्वारे निवडून आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस भाजपचे आ. पडळकर हे उपस्थित राहिले नाहीत. मात्र, उर्वरीत सर्व २० संचालकांनी उपस्थिती दर्शवली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे श्री. लाड आणि उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे श्री. पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले. (Congress) यामुळे या दोघांचीही अविरोध निवड होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.चव्हाण यांनी जाहीर केले. निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात १५ संचालकांनी अविरोध निवड झाल्यानंतर थेट मतदानाद्वारे सहा संचालकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये पक्षिय बलाबल काँग्रेस ६, भाजप ५, राष्ट्रवादी (शरद पवार) ४, शिवसेना (शिंदे गट) ३, राष्ट्रवादी (अजित पवार) २ आणि अपक्ष एक असे संख्याबळ होते. महाविकास आघाडी व महायुती यांचे संख्याबळ समान म्हणजे दहा संचालक होते, तर माजी खासदार संजयकाका पाटील हे एकमेव अपक्ष संचालक होते.(Congress) यामुळे संख्याबळाचा तराजू सम-समान असतानाही काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या साथीने बाजी मारत अध्यक्षपद मिळवले. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ज्या पध्दतीने शिवसेना शिंदे गटाला सोबत घेत सत्ता संपादन केर्ली. तीच रणनीती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राबविण्यात आली. अखेर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित
लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट