1 मेपासून अनेक गोष्टींमध्ये बदल होत आहेत. असेच एलपीजीच्या (prices) दरांमध्ये बदल होणार का, याबाबत देशभरातील ग्राहकांमध्ये चिंता दिसून येत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरू आहेत. यामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. अशा परिस्थितीत दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजीच्या किंमतीत बदल करतात, त्यामुळे 1 मेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सध्या उपलब्ध माहितीनुसार 30 एप्रिल 2026 रोजी एलपीजीच्या दरांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत (prices) सुमारे 60 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दर स्थिर ठेवण्यात आले असून, ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, व्यावसायिक वापरासाठी असलेल्या19 किलो सिलेंडरच्या बाबतीत वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. मार्च महिन्यात या सिलेंडरच्या दरात 144 रुपयांनी वाढ झाली आणि त्यानंतर 1 एप्रिल रोजी पुन्हा सुमारे 200 रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांवर खर्चाचा मोठा ताण आला आहे.
घरगुती LPG (14.2 किलो)चे प्रमुख शहरांतील सध्याचे दर काय?
नवी दिल्ली – ₹913
मुंबई – ₹912.50
कोलकाता – ₹939
चेन्नई – ₹928.50
हैदराबाद – ₹965
लखनऊ – ₹950.50
पटना – ₹1002.50
कमर्शियल LPG 19 किलो चे प्रमुख शहरांतील सध्याचे दर काय?
नवी दिल्ली – ₹2078.50
मुंबई – ₹1836
कोलकाता – ₹2208
चेन्नई – ₹2043.50
नोएडा – ₹1884.50
बेंगळुरू – ₹2161
हैदराबाद – ₹2105.50
जयपूर – ₹2031
अलीकडे काही भागात एलपीजी बुकिंगसंदर्भातील नियमांमध्ये (prices) बदल करण्यात आले आहेत. शहरी भागात आता एका सिलेंडरनंतर दुसरा बुक करण्यासाठी किमान 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल पूर्वी 21 दिवस होती. ग्रामीण भागात हा कालावधी 45 दिवसांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. या बदलांचा उद्देश वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राखणे आणि अनावश्यक साठेबाजी टाळणे हा आहे.
एलपीजी वितरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी आता OTP-आधारित डिलिव्हरी सिस्टम लागू केली जात आहे. सिलेंडर घरी पोहोचल्यावर ग्राहकाच्या मोबाईलवर एक वन-टाइम पासवर्ड येईल. तो OTP डिलिव्हरी एजंटला सांगितल्यावरच सिलेंडर देण्यात येईल. यामुळे काळाबाजार, फसवणूक आणि चुकीच्या वितरणाच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे.सध्या तरी ग्राहकांसाठी दिलासादायक परिस्थिती आहे कारण 1 मेपूर्वी कोणतीही नवीन दरवाढ जाहीर झालेली नाही. मात्र, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि वाढते इंधन खर्च यामुळे भविष्यातील दरांबाबत सावध राहणे गरजेचे आहे.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर