कोल्हापुरातील शिरोळमधील आणखी एका हत्तीणीवर वनताराकडून होणार उपचार

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिरातील मोनिका हत्तीणीवर उपचार करण्यासाठी गुजरातमधील वनताराचे सहा तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे. (elephant) गेल्या २० दिवसांपासून हे पथक मोनिकावर उपचार करत असून, तिची प्रकृती सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मोनिकाच्या मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, प्रजनन मार्गाशी संबंधित गुंतागुंतही निर्माण झाली आहे. त्यामुळे तिला स्वतःच्या पायावर उभे राहणेही शक्य होत नाही.

मोनिका २०१० पासून मंदिर संस्थानच्या देखरेखीखाली आहे. १ ऑक्टोबर रोजी तिची प्रकृती अचानक खालावली. डाव्या मागील पायाला दुखापत झाल्याने तिला उठता येत नव्हते. सुरुवातीला शिवमोग्गा आणि बंगळूर येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करण्यात आले. (elephant) मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे शरीराचा भार उजव्या पायावर पडू लागल्याने त्या पायालाही सूज येऊन गंभीर जखमा झाल्या.

अखेर मंदिर संस्थानने २६ ऑक्टोबरला वंताराकडे मदत मागितली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वंताराचे तातडीच्या प्रतिसाद पथक उदगावमध्ये दाखल झाले. मोनिकाच्या डाव्या मागील पायाचे हाड मोडले असून, उजव्या मागील पायाच्या तळव्यावरील त्वचा नखांसह निघाली आहे. याशिवाय प्रजनन मार्गातील गंभीर गुंतागुंतीमुळे काही ऊती बाहेर आल्या आहेत. या दुखापतींमुळे तिला प्रचंड वेदना होत आहेत.उपचारादरम्यान पायांवरील भार कमी करण्यासाठी पाण्यात उपचार करता यावेत, या उद्देशाने मंदिर परिसरात तलाव तयार करण्यात आला आहे. वेदना कमी करणे, जखमांवर उपचार करणे आणि मोनिकाला पुन्हा उभे करण्यासाठी डॉक्टरांचे पथक चोवीस तास प्रयत्नशील आहे.

मंदिर संस्थानचे पदाधिकारी यांनी सांगितले की, मोनिकाची प्रकृती सुधारण्यासाठी कर्नाटकातील तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले; मात्र अपेक्षित परिणाम मिळाला नाही. (elephant) त्यामुळे वंताराची मदत घेण्यात आली. वंताराच्या तज्ज्ञांकडून सध्या विशेष वैद्यकीय उपचार सुरू असून, मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.विशेष म्हणजे, नंदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीणीवर वंतारामध्ये १३ महिने उपचार करण्यात आले होते. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर ती नुकतीच परतली आहे. या घटनेनंतर अवघ्या ४५ दिवसांत उदगावमधील मोनिका हत्तीणीच्या उपचारासाठी पुन्हा वंताराचे पथक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले आहे.

हेही वाचा : 

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना