दुष्काळाच्या संकटात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपणा समोर आला आहे. सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच आतषबाजी केली.
राज्यातील 310 तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. (Sunetra Pawar) आणखी काही तालुके यादीत समावेश होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दुष्काळाच्या संकटामुळे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शेतातील पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहेत. परंतु मिळणारी मदत तुटपुंजी आहे, असं शेतकरी म्हणत आहेत. बैल, गायी, म्हशींना चारा मिळणेही अवघड झालं आहे. या दुष्काळातही सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपणा समोर आला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करण्यात आला. तर उद्यानाच्या लोकार्पणात रेड कार्पेटच्या पायघड्या पाहायला मिळाल्या. कंधार येथील शांतिदूत गोविंदराव पाटील उद्यानाच्या उदघाटनप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचां आढावा घेतल्याच्या काही तासानंतरच सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यादरम्यान फटाके फुटले. दुष्काळी परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. (Sunetra Pawar) कंधार येथील उद्यानाच्या लोकार्पणापूर्वी सुनेत्रा पवारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केलीय़े. सुनेत्रा पवारांच्या स्वागतासाठी ढोल ताशे वाजवले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘मी दुष्काळी आढावा घेतलाय. सर्व अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. शासन दुष्काळात सर्वासोबत असतील. पाणी चार नियोजन केले जात आहे. (Sunetra Pawar) याचा मी स्वतः आढावा घेणार आहे. शासन नियमाप्रमाणेच पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रखडलले प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात भुजल पातळी वाढविण्यासाठी जलतारा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवात झाली आहे. 200 फुटापेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदण्यावर बंदी घातली आहे. चारा प्रश्नासाठी 3 कोटी मंजूर असून 14 हजार शेतकऱ्यांना चारा वाटप केला गेलाय. शेतकऱ्यांनी चारा पिके घ्यावीत’.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं