इटालियन ब्रॅण्डकडून ‘कोल्हापुरी’ची विक्री! एक जोड घ्यायला पगारही पडेल कमी; साध्या चप्पलांपेक्षा 200% महाग

आपल्याला आपल्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत नसते असं म्हणतात.(Kolhapuri) सध्या असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलांसंदर्भात पाहायला मिळतोय. कारण प्रसिद्ध फॅशन कंपनी प्राडाने भारतात तयार केलेल्या लिमिटेड एडिशन कोल्हापुरी चप्पला बाजारात आणल्या असून या चप्पलांची किंमत पाहून कोल्हापुरकांनाही घाम फुटेल! खरं तर प्राडाने एका फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलांसारख्या चप्पला दाखवून त्यावर आपला दावा केला होता. मात्र त्यानंतर या इटालियन ब्रॅण्डविरुद्ध टीकेची झोड उठली होती. या कंपनीने आपली स्वत:ची चप्पल म्हणून जी सॅण्डल खपवण्याचा प्रयत्न केला ती कोल्हापुरातील कोणत्याही चप्पलांच्या दुकानात मिळणाऱ्या चप्पलांसारखीच होती.

मागील वर्षी जून महिन्यात यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता.(Kolhapuri) प्राडाने या चप्पलांचा उल्लेख ‘लेदर फूटवेअर’ म्हणजेच चामड्यापासून बनवलेल्या चप्पला असा केला होता. मात्र त्यांनी या भारतीय बनावटीच्या असल्याचा उल्लेख टाळलेला. यावरुनच या कंपनीवर संस्कृतीवर हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला.मात्र त्यानंतर प्राडाचे अधिकारी स्वत: कोल्हापुरला भेट देऊन तेथील चप्पलांच्या या उद्योगाबद्दल माहिती घेऊन गेले. या भेटीनंतर आठ महिन्यांनी प्राडाने आपल्या लिमिटेड एडिशनमध्ये केवळ 2 हजार कोल्हापुरी जोड बनवणार असल्याचं जाहीर केलं असून काही देशांमध्ये या चप्पलांची विक्रीही सुरु केली आहे. मेड इन इंडिया कोल्हापुरी चप्पलांपासून प्रेरित असलेल्या प्राडाच्या सँडल्स काही देशांमध्ये फेब्रुवारी 2026 पासून उपलब्ध आहेत.

सध्या त्या जगभरातील 40 स्टोअर्स आणि ऑनलाइन माध्यमातून विकल्या जात आहेत. (Kolhapuri) या चप्पलांची किंमत 800 युरो किंवा 930 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 83 हजारांहून अधिक होते. सामान्यपणे या चप्पला महाराष्ट्रात 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत मिळतात. साध्या कोल्हापुरी चप्पला 2000 हजाराच्या गृहित धरल्या तर प्राडाच्या चप्पलांची किंमत ही 200 पट अधिक आहे.

प्राडाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, जगभरातील मोजक्या प्राडा स्टोअर्स आणि ऑनलाइन माध्यमातून हे 2 हजार कोल्हापुरी जोड विकले जाणार आहेत. दरम्यान कंपनीने, कोल्हापुरी चप्पला बनवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील आठ जिल्ह्यातील कार्मचाऱ्यांना तीन वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण 180 जणांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सहा महिन्यांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण नॅशन इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून दिलं जाईल. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना इटलीमधील प्राडाच्या मुख्य कारखान्याचा दौराही करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार