बेळगावातील कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

कपिलेश्वर मंदिर परिसरातील कपिलतीर्थ तलावाची संरक्षण भिंत रविवारी सकाळी कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून मृत्यू झाला. शिवम परशुराम सुंडीकर (वय ७, रा. जेड गल्ली, शहापूर, बेळगाव) आणि परशुराम राजू निलजकर (११, रा. पाचवा क्रॉस, शिवाजीनगर, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. घटनास्थळी दिवसभर लोकांनी गर्दी होती. कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. (Kapiltirth)दरम्यान, तलाव आणि भिंत दुरुस्तीसाठी सातत्याने लोकांकडून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलांचा जीव गेला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश याबाबत खडेबाजार पोलिसांनी दिलेली माहिती अशी शहापूर येथील शिवम आणि शिवाजीनगर येथील परशुराम यांच्यासह काही मुले रविवारी सकाळी कपिलतिर्थ तलावात पोहण्यासाठी गेली होती. पोहून झाल्यानंतर सर्वांनी कपडे बदलले आणि मंदिर परिसरात जाऊन परत घटनास्थळी आले. सकाळी सुमारे नऊच्या ही मुले तलावाच्या बाजूला असलेल्या भिंतीखाली उभी होती. (Kapiltirth) त्यावेळी अचानक भिंतीचा काही भाग कोसळला. यामुळे सर्व जण पाण्यात कोसळले.
गोंधळात काही मुलांनी व उपस्थितांनी कसेबसे बाहेर येत आपला जीव वाचवला; मात्र शिवम सुंडीकर व परशुराम निलजकर पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिक व उपस्थितांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. दोघांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न केला. शिवमचा मृतदेह मिळाला आहे. परशुराम पाण्यात बुडाला असून, त्याचा शोध सुरू होता. (Kapiltirth) सायंकाळी उशिरा त्याचाही मृतदेह आढळला.
देवदर्शन करून परतताना काळाचा घाला! कारची लॉरीला जोराची धडक; एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच मृत्यू खडेबाजार पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून प्रकरणाची नोंद केली आहे. आमदार आसिफ सेठ, महापौर किर्ती कामकर, नगरसेवक गिरीष धोंगडी, राजू भांडकांडेसह महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?