तामिळनाडुत सत्तास्थापनेसाठी हालचाली, TVKसोबत काँग्रेसचं ‘डील’; खातेवाटप फॉर्म्युला ठरला?

तामिळनाडुत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.(decisions)यामुळे अनेक दशकांनी राज्यात पहिल्यांदाच आघाडी सरकार स्थापन होणार आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे आता इतर पक्षांना हाताशी धरून सत्ता स्थापन केली जाण्याची शक्यता आहे.टीव्हीके मुख्यालयात थलपती विजय याने नवनिर्वाचित आमदारांसोबत मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस ५ जागा, व्हिसीके, सीपीआय आणि सीपीआयएम प्रत्येकी २ अशा एकूण ११ आमदारांचा पाठिंबा टीव्हीकेला बहुमतासाठी पुरेसा असेल. या पक्षांसोबत अनौपचारिक चर्चा केली जात आहे. त्यांनी आघाडी सरकार स्थापन करण्याची इच्छाही व्यक्त केल्याचे समजते.

व्हिसीके प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी म्हटलं की, जनतेला आघाडी सरकार हवं आहे. (decisions)आम्ही आणि डावे पक्ष राज्यात धर्मनिरपेक्ष म्हणून काम करू. तर टीव्हीकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थलपती विजयने निवडणूक प्रचारावेळी आघाडी सरकारच्या विचारांचं समर्थन केलं होतं.तामिळनाडुत आघाडी सरकार स्थापन केल्यास काँग्रेसला २ मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तर व्हिसीके आणि डाव्या पक्षांना एक एक मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. टीव्हीके त्यांच्या सहकारी पक्षांना एकूण ४ ते ६ खाती देण्याच्या तयारीत आहे. टीव्हीके पहिल्यांदाच राजकारणाच्या मैदानात उतरला असून अनुभवाची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी सहकारी पक्षांच्या अनुभवाची मदत राज्य चालवताना होऊ शकते. टीव्हीकेचे बहुतांश आमदार हे पहिल्यांदाच निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे विजयला अनुभवी आणि जाणकार नेत्यांची गरज पडणार आहे.

सरकारमध्ये प्रशासनावर पकड रहावी यासाठी टीव्हीके माजी(decisions) आयएएस अधिकारी आणि भ्रष्टाचार विरोधी प्रतिमा असलेल्या यू सगायम यांना विधानसभेत आणण्याची तयारी करत आहे. थलपती विजय दोन जागांवर जिंकला आहे. त्यापैकी तिरुचि पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीद्वारे यू सगायम यांना उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
विजयच्या टीव्हीके पक्षाच्या आमदारांचा गट विधीमंडळ नेत्याची निवड करेल. त्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी दावा करेल. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी थलपती विजय एक आठवड्याचा वेळ मागू शकतो. आठवड्याभरात सरकार स्थापन केलं जाईल. तामिळनाडुत आजपर्यंत कोणत्याही एकाच पक्षाच्या हातात सत्ता राहिली आहे.पहिल्यांदाच आघाडी सरकार स्थापन होणार असल्यानं नवा इतिहास घडणार आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?