घाईगडबडीच्या वेळी भाजी काय बनवावी सुचत नाही अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये(vegetable) वांग्याची मसालेदार भाजी बनवू शकता. हा पदार्थ चपाती, भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो.


वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना वांग्याची भाजी खायला आवडत नाही.(vegetable) वांग्याच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडले जाते. घरात वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याची काप बनवली जातात. पण कायमच तेच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार वांग्याची भाजी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. वांग्याची भाजी गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत अतिशय सुंदर लागते. वांग्याच्या भाजीचे कधीतरी आहारात सेवन करावे. पण काही लोक वांग्याच्या भाजीतील बियांमुळे वांग्याची भाजी खाण्यास नकार देतात.पण घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या डब्यात किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही वांग्याची भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया वांग्याची मसालेदार भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत ‘चिकन भूना’

साहित्य:
वांग
लसूण
तेल
लाल मिरची
मोहरी
मीठ
नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल, नोट करून घ्या चवदार रेसिपी

कृती:
वांग्याची मसालेदार काप बनवण्यासाठी सर्वप्रथम, वांग स्वच्छ धुवून घ्या.(vegetable) ही भाजी बनवताना मोठ्या आकाराच्या वांग्याचा वापर करावा. त्यानंतर वांग मधून जाडसर कापून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, लसूण, चवीनुसार मीठ, आलं आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
तयार केलेला मसाला वाटीमध्ये काढून घ्या. वांग्याचे काप घेऊन त्यावर तयार केलेला मसाला दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्या. ज्यामुळे पदार्थाची चव वाढेल.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्त्याची पाने घालून भाजा. त्यानंतर त्यात मसाला लावून घेतलेलं वांग टाकून उरलेला मसाला ओतून झाकण मारून वाफ येण्यासाठी ठेवा.
मंद आचेवर वांग ५ मिनिट शिजल्यानंतर परतून घ्या. दोन्ही बाजूने वांग शिजल्यानंतर वांग्याची चव सुंदर लागेल.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसालेदार वांग्याची भाजी.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं