कोल्हापूर शहरात एका कॅफेमध्ये वाढदिवस साजरा (activities) करण्याच्या नावाखाली संशयास्पद प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या या कॅफेमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत होती. मात्र, या नावाखाली काही नाजूक आणि संशयास्पद उपक्रम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कॅफेवर छापा टाकला.

छाप्यादरम्यान कॅफेमध्ये चटया, उशा, तसेच सोफासेट (activities)अशा प्रकारची वेगळीच मांडणी आढळून आली. ही मांडणी पाहून पोलिसही काही काळ अचंबित झाले. कॅफेचा वापर केवळ खाद्यपदार्थांसाठी नसून इतर काही गोष्टींसाठी होत असल्याचा संशय अधिक बळावला आहे.पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच कॅफे मालकाविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी नेमकं काय सुरू होतं, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कारवाईची (activities) मागणीही जोर धरत आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?