बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. (case)आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर स्टेडियमबाहेर जल्लोषासाठी चाहते आले होते. मात्र चेंगराचेंगरीत चाहत्यांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले.(case)त्यामुळे आरसीबीच्या या विजयी जल्लोषाचं रुपांतर क्षणात शोकात झालं.
या प्रकरणात कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन, आरसीबी आणि डीएनए या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला.(case) त्यानंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या 2 पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केएससीएचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई जयराम या दोघांनी राजनीमा दिलाय. या दोघांनी केएससीएच्या अध्यक्षांकडे राजीनामा सूपूर्द केला आहे.
हेही वाचा :