इंडिया आघाडीला पहिला झटका! काँग्रेसने आघाडी तोडली, विजयच्या TVK ला पाठिंबा जाहीर

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक (alliance) विजयाची नोंद केली आहे. टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. यानंतर आता राज्यात नवं सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान काँग्रेसने डीएमके पक्षासोबतची आघाडी तोडली आहे. काँग्रेसने तामिळनाडूत सरकार गठीत करण्यासाठी विजयच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की, “टीव्हीके सोबतची आमची युती केवळ फक्त या सरकारची स्थापना करण्यासाठीच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेच्या भविष्यातील निवडणुकांसाठीही आहे.” तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर, केंद्रातील इंडिया आघाडीत काँग्रेस DMK सोबत कायम राहील की नाही? याविषयी शंका उपस्थित होत आहे. मात्र यासंदर्भात कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.

याआधी काँग्रेसने विजयचा पक्ष टीव्हीकेला सरकार स्थापन (alliance) करण्यासाठी आपला पाठिंबा असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस नेतृत्व आणि तामिळनाडू काँग्रेस कमिटीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी प्रेस रिलीज जारी करत, टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांनी काँग्रेसकडून औपचारिकपणे पाठिंबा मागितला होता अशी माहिती दिली.त्यांनी नमूद केलं की, तामिळनाडूच्या जनतेने आणि खासकरुन तरुणांनी एका धर्मनिरपेक्ष, पुरोगामी आणि लोकहित पाहणाऱ्या सरकारच्या बाजूने स्पष्ट व भक्कम जनादेश दिला आहे.

या जनादेशाचा आदर राखत, काँग्रेस पक्षाने ‘TVK’ ला आपला (alliance) पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, पक्षाने हेदेखील स्पष्ट केले की, हा पाठिंबा एका विशिष्ट अटीसह आहे. या आघाडीमध्ये भारताच्या संविधानाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही धार्मिक शक्तीचा समावेश केला जाऊ नये.तसंच टीव्हीके आणि काँग्रेसची ही आघाडी फक्त सरकारपुरती मर्यादित नसेल असंही काँग्रेसने प्रेस रिलीजमधून स्पष्ट केलं आहे. भविष्यात स्थानिक संस्था, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीतही आम्ही एकत्र असू असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. पेरुंथलैवर कामराज, पेरियार आणि डॉ. आंबेडकर यांच्या पाऊलवाटांवर चालत, दोन्ही पक्ष सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार

महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने

नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे