पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका गावात आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पौड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून गावोगावी फिरून आईस्क्रीम विकणाऱ्या एका नराधमाने १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.(ice cream) याप्रकरणी सतर्क ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी पौड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. आरोपी पिंटू शिवकुमार हा मूळ उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. तो पुण्यातील मुळशी तालुक्यातील सूस या गावात राहतो. काही दिवसांपूर्वी पिंटू हा दुचाकीवरून आईस्क्रीम विकण्यासाठी पीडितेच्या गावातील घराजवळ आला होता. (ice cream) यावेळी पीडित १४ वर्षीय गतिमंद मुलगी तिच्या लहान चुलत बहिणीसह आईस्क्रीम घेण्यासाठी त्याच्याकडे गेली होती.आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला जवळ ओढले. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. यामुळे घाबरलेल्या पीडितेने आरडाओरडा केला. त्यानंतर तात्काळ तिथून पळ काढत घर गाठले. तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
पोलिसांकडून आरोपीला अटक पीडितेने आरडाओरडा केल्याचे लक्षात येताच आरोपी पिंटू शिवकुमार याने तिथून दुचाकीसह पळ काढला होता. मात्र, पीडितेच्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने परिसरात त्याचा शोध सुरू केला. काही वेळातच आरोपीला शोधून काढण्यात आले. (ice cream) यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला पकडून पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. पौड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी पिंटू शिवकुमार याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सध्या पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?