कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा (groom) विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली.या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.

त्या विवाह सहळ्याला उपस्थित राहिलेल्या एकाचे 60 ग्रॅम वजनाचे (groom)सोन्याचे दागिने चोरी गेल्याने त्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी दोन जण मोटार सायकलवर राहाता तालुक्यातील ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.पथकाने सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे साडेअकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
सागर सुरेश कांबळे आणि अब्दुल इब्राहिम पिंजारी अशी आरोपींची नावे असून, (groom)साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सर्व आरोपी हे श्रीरामपूर शहरातील रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय.. पोलीस या चोरीच्या घटनेचा अधिकचा तपास करत असून आरोपींकडून चोरीच्या इतर काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे..
हेही वाचा
मोठी बातमी! राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?
‘गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या’ सुप्रिम कोर्टाचे आदेश
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार