सकाळी उठताच पाणी प्यायल्यास खरोखरच पोट साफ होतं का?

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय अनेकजण (wake) आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. विशेषतः पोट साफ होण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हे प्रभावी असल्याचे सांगितले जाते. मात्र यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.रात्री झोपल्यानंतर शरीर अनेक तास पाण्याविना राहते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि आतड्यांची हालचाल सक्रिय होण्यास मदत मिळते. यामुळे मलविसर्जन सुलभ होऊ शकते. काही लोकांना सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास अधिक मदत होत असल्याचा अनुभव येतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी पिण्यामुळे पचनसंस्था कार्यरत होते (wake)आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. मात्र फक्त पाणी पिल्यानेच कायमचा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो असे नाही. योग्य आहार, पुरेसे फायबर, व्यायाम आणि झोपही तितकीच महत्त्वाची असते.

अनेकदा कमी पाणी पिणे, तणाव, फास्टफूड किंवा अनियमित जीवनशैलीमुळे पोट (wake) साफ न होण्याचा त्रास वाढतो. त्यामुळे दिवसाभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक मानले जाते.तज्ज्ञ सांगतात की सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी पिण्याची सवय शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणत्याही आरोग्य समस्येमुळे त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?

‘गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या’ सुप्रिम कोर्टाचे आदेश

सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार