हुंड्याच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला(verdict) आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने वैष्णवीच्या सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे. “हुंडाबळी हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणाच्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर कट रचणे, आत्महत्येला प्रवृत्त करणे, आणि पुरावे नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप आहेत. आरोपींना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतात.

पीडितेच्या हक्कासोबत समाजहितही लक्षात घेणे आवश्यक असून (verdict) आरोपींना जामीन दिल्यास समाजहिताला बाधा येऊ शकते”, असे गंभीर निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले.वैष्णवी शशांक हगवणे वय २४ हिने हुंडा आणि जमीन खरेदीसाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी लता राजेंद्र हगवणे सासू, वय ५४, करिश्मा राजेंद्र हगवणे नणंद, वय २१, नीलेश रामचंद्र चव्हाण वय ३५यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि तक्रारदारांचे (verdict) वकील शिवम निंबाळकर यांनी जामीनाला तीव्र विरोध केला. “शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या शरीरावर ३० जखमा आढळल्या, ज्यावरून ११ ते १६ मे दरम्यान तिचा क्रूर छळ झाल्याचे सिद्ध होते. आरोपी नीलेश चव्हाण हा हुंड्याच्या प्रत्येक चर्चेवेळी उपस्थित होता आणि त्याने शशांक व करिश्माच्या मोबाइलमधील सीमकार्ड नष्ट केले. कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि नीलेश यांच्यातील निकटचे संबंध दिसून येतात”, ही माहिती त्यांनी न्यायालयात सादर केली.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 

 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;

भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!