भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम (ceremony)सामन्यानंतर सादरीकरण समारंभात मोठा गोंधळ झाला. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल आशिया कप 2025 चा फायनलचा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत विजय मिळवला. (ceremony)भारताचे संघाने पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा पराभूत करून आशिया कप २०२५ चे जेतेपद नावावर केले आहे. फायनल सामन्यांमध्ये भारताचा संघाने पाकिस्तानचा संघाला दोन चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्स ने पराभूत केले. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा युवा खेळाडू तिलक वर्मा याची अविश्वासनीय खेळी पाहायला मिळाली.

भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर सादरीकरण समारंभात मोठा गोंधळ झाला. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. हे नाट्य सुमारे दोन तास चालले. त्यानंतर मोहसिन नक्वी मैदानाबाहेर गेले आणि आयोजकांमधील एकाने ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफी घेतली. असे असूनही, भारतीय खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला.

पाकिस्तानला विरोध करण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या टी२० विश्वचषक २०२४ च्या विजयी सेलिब्रेशनची कॉपी केली. ट्रॉफीशिवाय भारताच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषद, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. जेव्हा पहलगाम हल्ला झाला आणि भारताने ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले, तेव्हा नक्वी यांनी भारताविरुद्ध विष ओकले. त्यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे, टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारली नाही.

भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्यातच नव्हे तर गट टप्प्यातूनच, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा निषेध केला. त्याची सुरुवात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्याशी हस्तांदोलन न केल्याने झाली. यानंतर, गट टप्प्यातील सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनीही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, ज्याला हस्तांदोलन वाद असे संबोधून वादग्रस्त ठरवण्यात आले. यानंतर, सामना जिंकल्यानंतर, सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ला आणि सशस्त्र दलांना विजय समर्पित करून उघडपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा :

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…!
आज नवरात्रीची महासप्तमी राशींसाठी भाग्यशाली! देवीचं प्रचंड पाठबळ, धनलाभाचे योग,
Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल