राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर (farmers)महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंचनाम्यांचे काम 4 ते 5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल आणि नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले.पुरामुळे राज्यात ठीकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. याबाबत सर्व शेतकरी आणि विरोधी पक्षानी शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार तसेच सर्व विरोधी पक्षांनी राजाच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. व काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली.

आता ही मदत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भेटेल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.नुकत्याच झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात सुमारे 60 हजार हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी व संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. (farmers)कळमेश्वर तालुक्यातील पाहणीदरम्यान बावनकुळे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रसह अनेक जिल्ह्यांत अशीच परिस्थिती असून, त्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. “कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही,” असा विश्वास बावनकुळे यांनी दिला.

पंचनाम्यांची आकडेवारी :-
– ऑगस्टमध्ये सरकारकडे 25 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे आले होते.
– सप्टेंबरमध्ये हा आकडा 22 लाख हेक्टर होता.
– आतापर्यंत 50 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे सरकारकडे उपलब्ध झाले आहेत.

“या वेळेस पंचनाम्यांत कोणतेही नियमांचे बंधन ठेवले जाणार नाही. सरसकट पंचनामे केले जातील, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळेल,” असे महसूल मंत्री म्हणाले. (farmers)सरकारच्या निर्देशानुसार पंचनाम्यांनंतर नुकसानभरपाईचे प्रस्ताव तातडीने पुढे पाठवले जातील. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 

 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;

भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!