कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हंता व्हायरसबाबत जागतिक आरोग्य क्षेत्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, (causing concern) अलीकडे एका क्रूझ शिपवर आढळलेल्या संसर्गामुळे अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. हा विषाणू कोविड-१९सारखा नवीन नसला तरी त्याची तीव्रता गंभीर मानली जाते.

ओशनवाइड एक्सपीडिशन्स कंपनीच्या एमव्ही होडिन्यस या जहाजावरील काही प्रवाशांना हंता व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली. या घटनेतील पहिला मृत्यू ११ एप्रिल रोजी नोंदवण्यात आला. ७० वर्षीय डच नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सेंट हेलेना येथे उतरवण्यात आला आणि तपासणीत त्यांना हंता व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नींनाही प्रकृती बिघडल्याने दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचाही २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

हंता व्हायरस प्रामुख्याने उंदरांद्वारे मानवांमध्ये पसरतो. संक्रमित उंदरांच्या मूत्र, लाळ किंवा विष्ठेतील सूक्ष्म कण हवेत मिसळतात आणि श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हा विषाणू अनेक वर्षांपासून अस्तित्वात असला तरी काही प्रकरणांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर १२ देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सेंट किट्स अँड नेव्हिस, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका या देशांतील नागरिक जहाजावर प्रवास केल्याने खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत.

हंता व्हायरसची सुरुवातीची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असतात. ताप, थकवा, अंगदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र संसर्ग वाढल्यास श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात पाणी साचणे, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही गंभीर रुग्णांमध्ये फुफ्फुसातून रक्तस्त्राव होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी स्वच्छता, उंदरांपासून बचाव आणि लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा

सावधान! हातात FASTag धरून टोल भरणे पडणार महागात

कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तेबाबत RBI चे मोठे पाऊल

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर