मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी (government) केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. Reliance Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आणि दूरसंचार विभागाने काही महत्त्वाचे नवे नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पारदर्शक सेवा आणि परवडणारे प्लॅन्स मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांकडून वारंवार वाढवले जाणारे रिचार्ज दर, लपवले जाणारे अतिरिक्त शुल्क आणि ग्राहकांना योग्य माहिती न देण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. याची गंभीर दखल घेत सरकारने टेलिकॉम कंपन्यांसाठी नवे मार्गदर्शक नियम तयार केले आहेत. आता कंपन्यांना प्रत्येक प्लॅनची संपूर्ण माहिती स्पष्टपणे ग्राहकांना देणे बंधनकारक होऊ शकते.

नव्या नियमांनुसार, रिचार्ज प्लॅनमध्ये काय सुविधा मिळणार, (government)डेटा मर्यादा किती आहे, कॉलिंग आणि एसएमएस सेवा किती दिवसांसाठी वैध असणार याची माहिती मोठ्या अक्षरांत आणि स्पष्ट पद्धतीने दाखवावी लागणार आहे. तसेच ग्राहकांच्या परवानगीशिवाय कोणतीही अतिरिक्त सेवा सक्रिय करता येणार नाही. यामुळे नकळत कट होणारे पैसे आणि ऑटो-ऍक्टिव्हेट होणाऱ्या सेवांपासून ग्राहकांची सुटका होणार आहे.
सरकारकडून ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी स्वस्त (government) रिचार्ज पर्याय उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कमी किमतीत अधिक वैधता आणि आवश्यक सुविधा असलेले प्लॅन्स बाजारात येण्याची शक्यता आहे.या नव्या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी मोबाईल ग्राहकांना मोठा फायदा होणार असून, टेलिकॉम क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि स्पर्धा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?