देशभरातील टोल प्लाझांवरील लांबच लांब रांगा, (Payment) वाहतूक कोंडी आणि वेळेचा होणारा अपव्यय आता इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकार लवकरच अत्याधुनिक ‘फ्री फ्लो टोलिंग सिस्टम’ लागू करण्याच्या तयारीत असून, यामुळे वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. वाहनं तब्बल 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतानाच टोलची रक्कम आपोआप खात्यातून वजा होणार आहे.

या नव्या प्रणालीमध्ये वाहनांवर बसवलेल्या विशेष नंबर प्लेट्स (Payment) आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने टोल वसुली केली जाणार आहे. महामार्गांवर उभारण्यात येणारे हायटेक सेन्सर्स आणि AI आधारित कॅमेरे वाहनांची ओळख पटवून थेट बँक खात्यातून किंवा FASTag खात्यातून टोल कापतील. त्यामुळे टोल नाक्यांवरील अडथळे पूर्णपणे हटवले जाणार असून प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
सध्या देशातील अनेक महामार्गांवर FASTag प्रणाली लागू असली तरी (Payment) अनेकदा स्कॅनिंगमध्ये अडचणी, अपुरी शिल्लक किंवा गर्दीमुळे वाहनांना थांबावे लागते. मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे वाहनांचा वेग कमी न करता टोल वसूल केला जाईल. सरकारच्या मते, या योजनेमुळे इंधनाची बचत, प्रदूषणात घट आणि प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.केंद्र सरकारने या प्रणालीसाठी काही निवडक महामार्गांवर चाचण्या सुरू केल्या असून, येत्या काळात टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर ही सुविधा लागू केली जाऊ शकते. या निर्णयामुळे भारतातील महामार्ग प्रवास अधिक स्मार्ट, आधुनिक आणि वेगवान होणार असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?