मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला(political news) धक्का देत माजी आमदार राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी ऑक्टोबर महिन्यात राजन तेली यांनी सिंधुदुर्गातील राणे कुटुंबीयांच्या एकाधिकारशाहीवर टीका करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या वर्षभरातच राजन तेली यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

राजन तेलींनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?
राजन तेलींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने सिंधुदुर्गात विविध चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा बँकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे सेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार राजन तेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहारातील फसवणूक प्रकरणी यांच्यासह आठ जणांविरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने गंभीर दखल घेतली.
राजन तेली यांच्यासह आठ जणांचा सहभाग-
जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर(political news) यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती. तक्रारीनुसार, 2021 ते 2022 दरम्यान कर्ज रकमेचा गैरवापर करून चुकीचे व्यवहार करण्यात आले. यात माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांचा सहभाग असल्याचे नमूद केले आहे. मुंबई येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी या तक्रारीवर चौकशीचे आदेश दिले.
आरोप असलेल्या कर्जदारांमध्ये प्रथमेश राजन तेली, सर्वेश राजन तेली, प्रदीप मनोहर केरकर, शैलजा एम. सिंगबाळ, सीमा महेश सबनीस, राजन कृष्णा तेली, रुजिता राजन तेली, सुनील कृष्णा निरवडेकर यांचा समावेश आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठी माजी आमदार राजन तेली यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर शिंदे सेनेत प्रवेश केल्याची चर्चा सिंधुदुर्गात आहे.
अनेक वर्षे राजन तेलींकडून दीपक केसरकरांना कडवी झुंज-
2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. दीपक केसरकर यांना 70902 मते मिळाली, तर राजन तेली यांना 29710 मते मिळाली. 41 हजारांहून अधिक मताधिक्याने केसरकर विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा(political news) व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. केसकरांना 69784 मते मिळाली, तर तेली यांना 56556 मते मिळाली. केसरकर यांना 13 हजार मतांची आघाडी मिळाली. सावंतवाडीतून ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. गेली अनेक वर्षे तेलींनी केसरकरांना कडवी झुंज दिली होती.

कोण आहेत राजन तेली?
-राजन तेली यांचा जन्म 25 जून 1990 साली कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला.
-1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केल.
-1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद.
-1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.
-1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले.
-1997 साली त्याच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी.
-2005 साली राणे समवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राणे समवेत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश.
-2007 साली विधान परिषद आमदार.
-2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेचा चेअरमन.
-2016 साली राजन तेली यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत राज्य सचिव पद दिलं.
-2020 साली भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद.
हेही वाचा :
आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .
राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…