आयसीसी वन डे क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम असून २०२७ वन डे वर्ल्ड कपच्या थेट पात्रतेची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे यजमान देश असल्यामुळे त्यांना स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. मात्र…

दरम्यान, आयर्लंडने (५४) झिम्बाब्वेला (५३) मागे टाकत ११ वे स्थान पटकावले आहे, तर अमेरिकेने स्कॉटलंडला मागे टाकत १३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिकेने ४६ गुणांसह स्कॉटलंडच्या ४४ गुणांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. संयुक्त अरब अमिरातीनेही १६ गुणांसह कॅनडाला मागे टाकत १९ वे स्थान मिळवले आहे.२०२७ ची वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२७ मध्ये खेळवली जाईल. २००३ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा आफ्रिका खंडात परतत आहे. (Indian team) यावेळी संघसंख्या १० वरून वाढवून १४ करण्यात आली आहे. आयसीसीच्या ३१ मार्च २०२७ च्या क्रमवारीतील अव्वल ८ संघ थेट पात्र होतील. उर्वरित ४ जागांसाठी पात्रता फेरीत सामने होतील. नामिबिया यजमान असूनही त्यांना पात्रता फेरीतून यावे लागेल.ODI World Cup 2027 direct qualification rules explained: भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडवर (११३ गुण) केवळ पाच गुणांची आघाडी घेतली आहे, तर ऑस्ट्रेलियाने (१०९ गुण) तिसरे स्थान कायम राखले आहे. भारताची रेटिंग एका अंकाने किंचित घसरली असून, आता त्यांच्या नावावर ११८ गुण आहेत.
वार्षिक क्रमवारी अद्ययावत करताना, मे २०२५ पासून खेळल्या गेलेल्या सामन्यांचे १०० टक्के रेटींग दिले जाते, (Indian team) तर मागील दोन वर्षांच्या निकालांना ५० टक्के रेटींग दिले जाते. दक्षिण आफ्रिका संघाने १०२ गुण मिळवून पाकिस्तानला ( ९८( पाचव्या क्रमांकावर ढकलले आहे. अव्वल १० मधील उर्वरित संघांमध्ये काही बदल झालेला नाही. श्रीलंका (९६), अफगाणिस्तान (९३) आणि इंग्लंड (८९) हे अव्वल आठ संघ आहेत. बांगलादेश ८४ गुणांसह नवव्या स्थानावर आहे, तर वेस्ट इंडिज आता ७४ गुणांवर आहे.
२०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ही क्रमवारी महत्त्वाची आहे. ३१ मार्च २०२७ रोजीच्या आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघ, तसेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे, यांनी थेट पात्रता मिळवली आहे. दक्षिण आफ्रिका अव्वल आठ स्थानांवर कायम राहिल्यास नवव्या स्थानावर असलेल्या संघाला वर्ल्ड कपचे तिकीट मिळेल. सध्या बांगलादेश नवव्या क्रमांकावर आहे आणि विंडीज १०व्या… त्यामुळे या दोन संघांमध्ये एका स्थानासाठी चढाओढ पाहायला मिळू शकते. (Indian team) दरम्यान, आयर्लंडने (५४) झिम्बाब्वेला (५३) मागे टाकत ११ वे स्थान पटकावले आहे, तर अमेरिकेने स्कॉटलंडला मागे टाकत १३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिकेने ४६ गुणांसह स्कॉटलंडच्या ४४ गुणांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. संयुक्त अरब अमिरातीनेही १६ गुणांसह कॅनडाला मागे टाकत १९ वे स्थान मिळवले आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?