मस्करी जीवावर बेतली चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू काय घडलं नेमकं?

सांगलीच्या जत तालुक्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून चुलत भावाने महादेव बिरादार याचा गळा दाबून खून केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच भावाचा जीव घेतल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ काही लोकांनी कॅमेरात कैद केला आहे. ही घटना जत तालुक्यातल्या भिवर्गी येथील गौडर वस्ती येथे हा प्रकार घडला.या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे नाव महादेव बिरादार (वय २६) असे आहे. (Sangli) तर आरोपीचे नाव सालसिद्ध बिरादार असे आहे. दोघेही एकाच भावकीतील असल्याचे सांगण्यात आले. महादेव हा शेती व्यवसाय करत होता. तर पत्नी नुकतीच बाळंतपणासाठी माहेरी सोलापूर जिल्ह्यातील कुसूर येथे गेली आहे. महादेव हा कुटुंबातील मोठा मुलगा आहे.

महादेव आणि सालसिद्ध या दोघांमध्ये मस्करीमुळे किरकोळ वाद झाला आणि त्याच कारणावरून हत्येची घटना घडली. आरोपीने महादेवच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांनतर तो बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. त्यावेळी हा प्रकार काही लोकांच्या निर्दशनास आला. (Sangli) त्यांनतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी महादेवला चारचाकी वाहनातून जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान सालसिद्ध हा घटनास्थळावरून पसार झाला होता.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सालसिद्ध याला गावातून ताब्यात घेतले. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. दोघांनीही मद्यपान केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी महादेवचा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे.याबाबत उमदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगलीतून एक धक्कादायक समोर आली आहे. जत तालुक्यातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसरी गावात घडली. 2023 साली विहिरीतून गाळ काढण्याच्या वादातून विलास यमगर आणि प्रशांत यमगर यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. (Sangli) या प्रकरणाची सुनावणी सांगली येथील न्यायालयात सुरु होती. या खटल्यातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांची सुपारी देऊन निर्घुण हत्या करण्यात आली.

हेही वाचा

चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू

महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात

बोरगावात कडकडीत बंद