प्रेयसीकडून फसवणूक होण्याची शक्यता या राशीने सावध व्हावे!

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी
आज एखाद्या सामाजिक कार्यक्रमातच तुम्हाला तुमची जीवनसाथी मिळेल.(horoscopes) तिच्या सहवासात तुम्ही सुखावून जाल. जीवनाच्या चढउतारात ही जीवनसाथी तुम्हाला खंबीर साथ देईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखादी खूश खबर मिळेल. प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. उधार दिलेली रक्कम परत मिळेल. आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे.

वृषभ राशी
व्यावसायिक यश मिळेल. आरोग्याची समस्या आज दूर होताना दिसेल. प्रेम प्रकरणातील वादळ थंड होईल. पूर्वी पेक्षा आता त्यात सुधारणा होईल. एकंदरीतच तुमचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. एखादी पिवळी वस्तू दान करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. गावाला जाण्याचा योग आहे. कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून मुक्त व्हाल. मनसोक्त आंबे खाण्याचा योग आहे.

मिथुन राशी
प्रवासात मोठा फायदा होणार आहे. तुमच्या नशिबाने तुमची राहिलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. प्रेम प्रकरणात यश येईल. महाकाली मातेची पूजा करा. घरातील कलह दूर होतील. घरातील मोठ्या लोकांचा सल्ला घ्या. परस्पर निर्णय घेणं घातक ठले. आज वाहन खरेदीचा योग आहे.

कर्क राशी
आज गंभीर दुखापत होऊ शकते. एखाद्या अडचणीत सापडाल. त्यामुळे आज थोडं जपूनच वागा. आरोग्य मध्यम राहील. प्रेम आणि व्यापारातही बरा प्रतिसाद मिळेल. गावाकडील शेतीवाडीचे वाद सुटतील. मोठं काम हाती घ्याल. न कळत झालेल्या चुकीचा मोठा फटका बसेल. कुणालाही दुखावू नका. शेजारच्यांशी पटणार नाही. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कसून अभ्यास करावा लागणार आहे.

सिंह राशी
आज लग्नाचा योग आहे. तुमचं लग्न जुळेल. मनासारखं स्थळ मिळाल्याने प्रसन्न राहाल. आज प्रियकर आणि प्रेयसीची भेट होईल. जीवनसाथी सोबतचा आजचा दिवस अत्यंत आनंदात जाईल. (horoscopes) व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आरोग्य, प्रेम आणि व्यापारात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक न सांगता घरी पाहुणे येतील. शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस बरा नाही. अवकाळीमुळे नुकसान होईल.

कन्या राशी
विरोधक आज तुमच्या मागेपुढे करतील. तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामागे काही डाव असू शकतो. सावध राहा. आज तुमचं बऱ्याच महिन्यांपासून अडलेलं काम मार्गी लागेल. गावाकडे जाण्याचा योग आहे. खूप जुना मित्र भेटल्याने आनंदाला पारावर उरणार नाही. तुमच्या जुन्या शाळेत जाण्याचा योग येईल. घरातील कलह वाढतील. त्यामुळे थोडा त्रास होईल.

तुळ राशी
जुनी लफडी डोकं वर काढतील. त्यामुळे घरात कटकटी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवून प्रकरण मिटवण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी जाणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यापारात लाभ होईल.

वृश्चिक राशी
आज नको त्या भानगडीत पडू नका. जमीन, वाहन आणि घर खरेदी करण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. नवीन उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांना आजचा दिवस वाईट जाईल. कामाच्या ठिकाणचे सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून ओरडा पडण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.

धनु राशी
आज तुम्ही अधिक आक्रमक राहाल. रोजगारात यश मिळवण्यासाठी तुम्हाला आज भावा-बहिणीची भक्कम साथ मिळेल. लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. (horoscopes) मनोरंजन क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस घवघवीत यश देणारा राहील. आरोग्यात हळूहळू सुधारणा होईल. बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. नको त्या उचापती करू नका. उगाच हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर अडचणी वाढतील.

मकर राशी
आज तुमच्याकडे पैशाचा ओघ राहील. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबीयांशी जुळवून घ्याल. कामाच्या ठिकाणी होणारा त्रास कमी होईल. अचानक नोकरी बदलावी लागण्याची शक्यता आहे. परदेश दौऱ्याचा योग आहे. व्यापारात बरकत येईल.

हेही वाचा

चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू

महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात

बोरगावात कडकडीत बंद