संतापजनक! भर रस्त्यात तरुणांचे महिला रायडरला अर्धनग्न अवस्थेत अश्लील इशारे Video viral

अलीकडे महिलांसोबतच्या गैरवर्तनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.(remarks)गैरवर्तन करणारे, लैगिंक अत्याचार करणार आता दिवसा-ढवळ्या, रात्री-अपरात्रीही महिलांना त्रास देत आहे. गेल्या काही काळात सोशल मीडियामुळे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला रायडरसोबत काही तरुणांनी भर रस्त्यात अश्लील इशारे केले आहेत. त्यांच्या या कृत्याने सोशल मीडियावर संताप उसळला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये रात्रीच्या वेळी हायवे मार्गावर घडली आहे.

या महिला रायडरने घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या घटनेचे वर्णने करताना सांगतिले की, ती बाईल चालवत असताना अचानक एक गाडी आली आणि त्यात काही मुले अर्धनग्न अवस्थेत होती. या तरुणांनी तिच्यासोबत गैरवर्तने केले. या महिलेने गाडीचा नंबरही शेअर केला आहे. (remarks)धक्कादायक बाब म्हणजे, तिने पोलिसांकडे याची तक्रारही केली परंतु काही कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, उत्तराखंडच्या हरिद्वार हायवे मार्गावर एक महिला रायडर बाईक चालवत आहे. याच वेळी एक चारचाकी गाडी तिथून जाते. या गाडीमध्ये काही तरुण अर्धनग्न अवस्थेत असतात. एक तरुण गाडीच्या खिडकीतून बाहेर डोके काढून बसलेला असतो. तो महिलेकडे पाहून तिला अश्लील इशारे करतो, तसेच मागे बसलेले काही मुलेही तिच्याकडे बघून तिला फ्लाईंग किस देतात, तसेच तिच्याशी गैरवर्तन करतो. ही सर्व घटना महिलेच्या कॅमरामध्ये कैद झाली आहे. तरुणीने दावा केला आहे की, सर्व तरुण उत्तर प्रदेशातील आहेत. तसेच तिने पेट्रोलिंग पोलिसांकडे देखील तक्रार केली, (remarks)परंतु या तरुणांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे महिलेने म्हटले. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “तुम्ही बरोबर केले” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “अशा लोकांना चाबकाने मारले पाहिजे” असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने “पोलिसांनी कारवाई का केली नाही?” असा प्रश्न केला आहे. तर एकाने महिला रायडला “मॅम तुम्ही इतक्या रात्री बाहेर कशाला गेला तेही एकट्या” असे म्हटले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी संधी – Aditya Tutorials कडून प्रवेश प्रक्रिया सुरू

‘मी डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला, कोणीच ऐकलं नाही अन्…’ इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशने सांगितला थरार