उसाच्या शेतात गांजाची लागवड बालेवाडीतील शेतकर्‍यावर गुन्हा

बालेवाडी (ता. गगनबावडा) येथील उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, (sugarcane) याप्रकरणी एका शेतकर्‍यावर गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गगनबावडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही कारवाई केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी गावातील वड्याची खडी परिसरातील उसाच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (sugarcane) त्यानुसार बुधवारी (दि. 13) सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान अंदाजे एक किलो 290 ग्रॅम वजनाची हिरव्या रंगाची गांजाची रोपे, ओलसर पाने व देठ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 12 हजार 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संशयित प्रकाश बाळू जाधव (39, रा. बालेवाडी, ता. गगनबावडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी