सावधान! हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी नाहीतर गाठावे लागेल हॉस्पिटल

आपण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्यापिण्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. भूक लागली की पटकन काहीतरी खाणे आणि त्यानंतर लगेच पाणी पिणे ही अनेकांची सवय असते. पण हीच सवय काही वेळा आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, (food and drink) काही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो आणि शरीराला आवश्यक पोषक घटक योग्य प्रकारे मिळत नाहीत.

विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे कलिंगड आणि खरबूज यांसारख्या फळांमध्ये आधीच भरपूर पाण्याचे प्रमाण असते. ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील पचनरस पातळ होतात. (food and drink) त्यामुळे अन्नाचे पचन मंदावते आणि पोट फुगणे, गॅस किंवा जुलाबाचा त्रास निर्माण होऊ शकतो.गरम चहा किंवा कॉफीनंतर लगेच थंड पाणी पिण्याची सवयही आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. गरम आणि थंड पदार्थांचा अचानक संपर्क आल्याने दातांच्या इनॅमलवर परिणाम होतो. यामुळे दात संवेदनशील होण्याची शक्यता वाढते. काही वेळा घशात खवखव, सर्दी किंवा खोकल्याचाही त्रास सुरू होऊ शकतो.

शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास घशामध्ये त्रास जाणवू शकतो. शेंगदाण्यांतील तेलकट घटक पाण्यामुळे घशात चिकट थर तयार करतात. त्यामुळे खवखव, जळजळ आणि सतत खोकला येण्याची शक्यता वाढते.केळी खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. केळ्यामधील स्टार्च आणि फायबर पचण्यासाठी वेळ लागतो. त्यावर लगेच पाणी प्यायल्यास अपचन, पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

दूध प्यायल्यानंतर त्वरित पाणी पिणेही योग्य मानले जात नाही. दूध हे स्वतःमध्ये संपूर्ण आहार मानले जाते. (food and drink) त्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास दुधातील प्रथिने आणि पोषक घटकांचे योग्य पचन होत नाही. त्यामुळे पोटात जडपणा, गॅस किंवा अस्वस्थता जाणवू शकते.तज्ज्ञांच्या मते, कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याऐवजी काही वेळ थांबणे अधिक फायदेशीर ठरते. साधारणपणे ३० ते ४५ मिनिटांनंतर पाणी प्यायल्यास पचनसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करते आणि शरीराला अन्नातील पोषक घटक अधिक प्रभावीपणे मिळतात.

हेही वाचा

जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात

ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?