राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट

निवडणूक सल्लागार आणि ज्येष्ठ नेते प्रशांत किशोर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नवे रणनीतीकार म्हणून काम पाहणार आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीत नेमका काय निर्णय झाला आणि १ जूनपासून ‘पीके’ची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज (१९ मे) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांनी राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. (Nationalist) या बैठकीनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रशांत किशोर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रशांत किशोर यांची कंपनी कामाला सुरुवात करणार आहे. येत्या १जून पासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिलाली आहे. प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीकार आणि चाणक्य ओळखले जातात. (Nationalist) यापूर्वीही त्यांनी अनेक पक्षांचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम पाहिले आहेत. यापुढील ३ वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे 2029च्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.प्रशांत किशोर हे देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. राजकीय वर्तुळात त्यांना ‘पीके’ या नावानेही संबोधले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेची यशस्वी रणनीती आखल्यानंतर प्रशांत किशोर देशभरात चर्चेत आले होते.

यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासह विविध प्रादेशिक पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखली. तसेच पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जनगमोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पार्टीसाठी, याशिवाय तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम आणि आम आदमी पार्टी यांसारख्या अनेक पक्षांसाठीही त्यांनी यशस्वी प्रचार मोहिमा राबवल्या आहेत.राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी सुमारे आठ वर्षे संयुक्त राष्ट्रांसोबत सोबत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम केले होते. (Nationalist) त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून स्वतंत्र कारकीर्द सुरू केली.

दरम्यान, राजकीय प्रचार आणि ब्रँडिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘डिझाईन बॉक्स’ने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी देखील ही विशेष प्रचार मोहिम राबवली होती. डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट क्षेत्रातील महत्त्वाचे नाव मानले जाते. राजस्थान, कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये त्यांनी काँग्रेससाठी प्रचार मोहिमांचे नियोजन केले आहे. राजकीय ब्रँडिंग, संदेश व्यवस्थापन आणि इमेज मेकओव्हरमध्ये त्यांचा विशेष हातखंडा मानला जातो.

लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाची प्रतिमा नव्याने उभी करण्याची जबाबदारी नरेश अरोरा आणि त्यांच्या टीमने स्वीकारली होती. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागले होते. हीच ‘गुलाबी कॅम्पेनिंग’ रणनीती नरेश अरोरा यांनी तयार केल्याची चर्चा होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध दुकाने बंद..?

होर्मुझच्या नाकाबंदीमुळे खरीप हंगामावर सावट

मिरजेत एकाच रस्त्यासाठी तीनवेळा निधी..!