बॉलिवूडची ‘बागी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी दिशा पटानी ही इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या फिटनेस आणि स्टायलिश(lehenga) फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण एकदा तिची बोल्डनेसच तिच्यासाठी संकट ठरली होती.ही घटना आहे साल 2018 मधील. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर दिशा पटानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतून तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण या फोटोमुळे दिशा पटानी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आणि शेवटी तिला ती पोस्ट डिलीट करावी लागली.

दिशा पटानीने धनत्रयोदशीच्या दिवशी पारंपरिक लेहंगा (lehenga) घातला होता पण तिने ब्लाऊजच्या जागी तिने कॅल्विन क्लाईन या इनरवेअर ब्रँडचा ब्रा परिधान केला होता. या फोटोत दिशा अत्यंत स्टायलिश दिसत होती पण भारतीय पारंपरिक सणाच्या दिवशी अशा पोशाखात फोटो पोस्ट करणं अनेकांना अजिबात आवडलं नाही.दिशा पटानीने फोटो पोस्ट करताच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. काहींनी म्हटलं ‘ही भारतीय संस्कृतीची थट्टा आहे तर काहींनी तिला ‘फेस्टिव्ह प्रमोशनच्या नावाखाली वाद निर्माण करणारी अभिनेत्री’ असं म्हटलं.
लोकांनी दिशा पटानीवर आरोप केला की ती धनत्रयोदशीच्या दिवशी स्वतःच्या ब्रँड प्रमोशनसाठी अशा कपड्यांमध्ये फोटो पोस्ट करून भारतीय परंपरेचा अपमान करत आहे. काहींनी तर इतकंही म्हटलं की, ‘दिवाळीसारख्या सणाला ही पश्चिमी संस्कृतीचं प्रदर्शन करत आहे.’या प्रचंड ट्रोलिंगनंतर दिशा पटानीने ती पोस्ट काही तासांतच डिलीट केली. जरी तिने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी नंतर तिने दिवाळीसारख्या पारंपरिक सणांवर अशा बोल्ड पोस्ट करणे टाळले आहे.
ही घटना घडून अनेक वर्षे झाली असली तरी आजही चाहते या घटनेचा उल्लेख करतात. दिशा पटानी अजूनही तिच्या बोल्ड फोटोंसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर बिकीनी फोटो (lehenga)आणि सिंपल लुकमधील फोटो प्रचंड आहेत.तरीही 2018 ची ती घटना तिच्यासाठी मोठा धडा ठरली होती. त्या घटनेनंतर दिशा पटानी सणांच्या पोस्ट्समध्ये थोडी जास्त सावध राहते. पण तिच्या ग्लॅमरस आणि आत्मविश्वासात मात्र अजिबात घट झालेली नाही.
हेही वाचा :
टीम इंडियाचा सामना आता फक्त 60 रुपयांत पाहता येणार!
सरकारी गॅरेंटी, एकदा पैसा लावा दर महिन्याला इन्कम मिळणारच…
सलमान खान बलूचिस्तानबद्दल ‘हे’ काय बोलून गेला?