महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतात ₹१२०००; पीएम किसानशिवाय या योजनेचा मिळतो लाभ

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे.(benefit)पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी या योजनेचा लाभ दिला जातो. दरम्यान, याचसोबत शेतकऱ्यांसाठी विविध राज्य सरकारनेही योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येतो.

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे ६००० आणि नमो (benefit) शेतकरी योजनेचे ६००० असे एकूण १२,००० रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. हे पैसे थेट डीबीटीगद्वारे तुमच्या खात्यावर जमा केले जातात.

पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २२ हप्ते देण्यात आले आहेत. (benefit)आता शेतकरी २३व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नमो शेतकरी योजनेचे ८ हप्ते जमा झाले आहेत. नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता येण्यास खूप उशिर झाला आहे. आता नववा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता मिळू शकतो.

हेही वाचा

लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक