पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट

पुढील दोन दिवस राज्यात (alert) उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून अनेक भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तापमानात मोठी वाढ होऊन काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विशेषतः विदर्भ, मराठवाडा (alert) आणि पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये दुपारच्या वेळी प्रचंड उकाडा जाणवणार आहे. सकाळपासूनच उष्णतेची झळ बसू लागणार असून दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.हवामान तज्ज्ञांच्या मते, कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता, उष्माघात आणि थकवा यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, (alert) हलके कपडे परिधान करणे आणि शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर न जाणे अशा उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.