महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये (curiosity) आनंद आणि थोडीशी उत्सुकता दोन्हीही दिसून येत आहेत. वर्षभराच्या मेहनतीनंतर मिळालेली सुट्टी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी असली, तरी आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे—निकाल कधी लागणार?

फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान राज्यभरात बारावी आणि दहावीच्या परीक्षा पार पडल्या. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत झाली, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान घेण्यात आली. परीक्षा संपून आता जवळपास एक महिना उलटला असून निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या गुण नोंदविणे आणि निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. राज्यभरातील सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणीही वेगाने सुरू असून मोठ्या प्रमाणात पेपर तपासून झाले आहेत. उर्वरित काम काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
यामुळे एप्रिलचा शेवट आणि मेचा प्रारंभ हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतात. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल तपासता येईल.
हेही वाचा
धक्कादायक! तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसाच्या कृत्याने संताप
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक
करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल