धक्कादायक! तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसाच्या कृत्याने संताप

पोलीस हे जनतेचे रक्षक मानले जातात. मात्र हेच पोलीस भक्षक होत (Complainant)असतील तर त्यांच्यावर देखील समान कायदा लागू करून शिक्षा करणं गरजेचं आहे. आजच्या घडीला देशभरात लाचखोरी, बलात्कार, अशा अनेक प्रकारांमध्ये पोलिसांचाही हात असल्याचं काही प्रमाणावर आढळून येत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बोलिया जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या धक्कादायक मागणीनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा वन विभागात कार्यरत (Complainant)असलेल्या एका उपनिरीक्षकाशी हिंदू रितीरिवाजानुसार एका मंदिरात विवाह झाला होता. त्यानंतर आरोपीने सुमारे आठ महिने तिचे लैंगिक शोषण केले. मात्र जेव्हा तिने कोर्ट मॅरेजसाठी त्याच्यावर दबाव टाकला, तेव्हा त्याने तिला नकार दिला. यानंतर, त्या महिलेने त्याच्या विरोधात फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी चार्जशीट लावण्यासाठी महिलेने पोलिसांकडे मागणी केली (Complainant) असता संबंधित दोन पोलीस अधिकाऱ्यांनी पिडीतेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. या संवादाचे कॉल रेकॉर्डिंग पोलीस ठाण्यात पुरावा म्हणून सादर करत महिलेने सदर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.याप्रकरणी आता नराधम दोन पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. महिलेने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस युनिरीक्षक चांगलाच गोत्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील सखोल तपास सुरु असून जनतेचा रक्षकच भक्षक बनल्याने सर्वसामान्यांनी न्यायासाठी कोणापुढे हात पसरावे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा

लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक