वाढतो हार्ट ब्लॉकेजचा धोका, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

सध्या वाढत्या ताणाचा परिणाम अनेकांच्या ह्रदयावर होतो, (Doctors) मग त्यांना काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. अर्थात ही समस्या काही एका रात्रीत उद्भवणारी नाही. तुम्ही जर याची लक्षणं वेळीच उपचार केलेत तर तुम्हाला याच्यामुळे निर्माण होणाऱ्या जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही. त्यात बऱ्याच जणांचा समज असतो की, हृदयविकार हा फक्त BP वर अवलंबून असतो. पण याची अनेक कारणं आहेत.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मल वाटतं, (Doctors) तेव्हा सुद्धा ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असू शकतात. याचं मुख्य कारण म्हणजे कॉलेस्टेरॉल, फॅट आणि कॅल्शियम यांच्या साचल्यामुळे तयार होतं. या प्रक्रियेला वेळ लागतो. तर याची लक्षणंही दिसत नाहीत. पण अनेकांना हाच प्रश्न पडतो की, हृदयात ब्लॉकेज आहे का कसं ओळखायचं? चला थोडक्यात जाणून घेऊयात.तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला यासाठी टप्प्याटप्प्याने काही टेस्ट कराव्या लागू शकतात. ECG ही पहिली टेस्ट असेल. त्याने ह्रदयावर ताण आहे का? हे कळतं. ट्रेडमिल टेस्टमुळे व्यायाम करताना हृदय कसं काम करतं हे समजतं, तर 2D इकोमुळे हृदयाच्या स्नायूंची हालचाल कळते.

तसेच CT कोरोनरी अँजिओग्राफीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे का? (Doctors) हे स्पष्ट कळतं. कोरोनरी कॅल्शियम स्कोअरमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील समस्या ओळखता येते. तर कोरोनरी अँजिओग्राफी ही सर्वात अचूक चाचणी मानली जाते.डायबेटीज, कोलेस्टेरॉल, धूम्रपान, लठ्ठपणा किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ४० वर्षांनंतर नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. हृदयातील ब्लॉकेज हळूहळू वाढतं आणि सुरुवातीला लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि जीवनशैलीत बदल केल्याने मोठा धोका टाळता येतो.

हेही वाचा

लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक